Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दुसऱ्याच्या चेकवर केस करणे पडले महागात, आरोपीची निर्दोष मुक्तता
न्यायालय

दुसऱ्याच्या चेकवर केस करणे पडले महागात, आरोपीची निर्दोष मुक्तता

बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये चेक नेमका कोणाचा आहे आणि त्यावर सही कोणाची आहे, हे तपासणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
चेक बाऊन्स प्रकरणात संगमनेर न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा चेक घेऊन फौजदारी खटला दाखल करणे फिर्यादीला चांगलेच महागात पडले आहे. कायदेशीर त्रुटींमुळे न्यायालयाने आरोपी संभाजी पांडुरंग पवार यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
फिर्यादी डॉ. अमोल संताजी कर्पे आणि आरोपीचा मुलगा डॉ. विक्रम पवार हे दोघेही एकाच व्यवसायातील असल्याने त्यांची ओळख होती. वायनरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आरोपी व त्यांच्या मुलाने डॉ. कर्पे यांच्याकडून ५ लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये परत केल्यानंतर, उर्वरित ३ लाख ५० हजार रुपयांच्या वसुलीसाठी फिर्यादीला एक चेक देण्यात आला. हा चेक बँकेत अपुऱ्या निधीअभावी बाऊन्स झाला. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने डॉ. कर्पे यांनी आरोपी संभाजी पवार यांच्याविरुद्ध कोर्टात धाव घेतली.
संगमनेरच्या ४ थे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे वकील सोहेल एच. शेख यांनी कोर्टासमोर बँकेचे महत्त्वाचे दस्तऐवज सादर केले. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, जो साडेतीन लाख रुपयांचा चेक फिर्यादीने कोर्टात सादर केला होता, तो प्रत्यक्षात आरोपी संभाजी पवार यांच्या खात्याचा नव्हताच. तो चेक त्यांचा मुलगा विक्रमसिंग पवार यांच्या नावावर असलेल्या एकल खात्याचा होता आणि त्यावर स्वाक्षरी देखील मुलाचीच होती. न्यायालयाने हा खटला निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाच्या ‘अर्पना शाह विरुद्ध शेठ डेव्हलपर्स’ या प्रसिद्ध खटल्याचा संदर्भाचा आधार घेतला. एन.आय. अ‍ॅक्टच्या कलम १३८ नुसार, चेक बाऊन्स प्रकरणात केवळ चेक देणाऱ्या व्यक्तीवरच फौजदारी कारवाई केली जाऊ शकते, म्हणजेच ज्याच्या खात्याचा चेक आहे आणि ज्याने त्यावर सही केली आहे तोच दोषी धरला जाऊ शकतो. प्रस्तुत प्रकरणात फिर्यादीने मूळ खातेदार असलेल्या मुलाला आरोपी केलेच नव्हते.
धनादेश दुसऱ्या व्यक्तीच्या खात्याचा असल्याने आणि कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत नसल्याने न्यायालयाने आरोपी संभाजी पांडुरंग पवार यांची फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २५५(१) अन्वये गुन्ह्यातून मुक्तता केली. कोर्टाच्या या निर्णयामुळे चेक बाऊन्सच्या प्रकरणांमध्ये चेक नेमका कोणाचा आहे आणि त्यावर सही कोणाची आहे, हे तपासणे किती गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,286
धनादेश बाउंस निर्दोष मुक्तता संगमनेर न्यायालय सोहेल शेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये वकिलाच्या हत्येप्रकरणी ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा मोठा निकाल

28/08/2026

चेक बाऊन्स प्रकरणी संगमनेर येथील सराफाला ६ महिने कारावास आणि साडेसहा लाखांच्या भरपाईचा आदेश

19/08/2026

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

30/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.