Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला
न्यायालय

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; आमदारकी टांगणीला

निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटी आणि थकबाकीच्या मुद्द्यावर कायदेशीर कचाट्यात सापडल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार की रद्द होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई / संगमनेर:
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकारणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची आमदारकी थेट धोक्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. थोरात यांच्या बाजूने वकील ॲड. अमित कारंडे यांनी न्यायालयात मुद्दा मांडला की, खताळ यांची ‘नीलकमल’ नावाची भागीदारी संस्था असून त्याचा ५४ हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता आणि ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली. यावर खताळ यांनी आपण या फर्मचे भागीदार नसून ती विसर्जित झाल्याचा दावा केला होता. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात खताळ यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना स्पष्ट केले की, नियमानुसार लहान किंवा मोठी थकबाकी असली तरी कायदेशीर कारवाई निश्चित होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणावर नियमित सुनावणी व खटला चालणार आहे. थोरात यांचे वकील ॲड. अमित कारंडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा असल्याने पुढील सहा महिन्यांत या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि सर्व पुरावे पाहता अमोल खताळ यांची निवड रद्द होईल असा विश्वास आहे.
चार दशकांहून अधिक काळ संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ आमदार झाले होते, मात्र आता निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटी आणि थकबाकीच्या मुद्द्यावर कायदेशीर कचाट्यात सापडल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार की रद्द होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,217
अमोल खताळ बाळासाहेब थोरात संभाजीनगर खंडपीठ सर्वोच्च न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे देशात आदर्श मॉडेल ठरलेल्या…

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.