Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

या भेटीदरम्यान उपस्थित कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अण्णा हजारे, थोरात आणि डॉ. तांबे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली. मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारांनंतर अण्णा नुकतेच राळेगणसिद्धी येथे परतले आहेत. या पार्श्वभूमीवर थोरात व तांबे यांनी अण्णांच्या प्रकृतीची अत्यंत आपुलकीने चौकशी करत त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना केली.

शनिवारी झालेल्या या भेटीदरम्यान अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पद्मभूषण अण्णा हजारे हे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण आहेत. सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांतील त्यांचे योगदान आगामी अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील. याचवेळी राज्यातील बळीराजाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत थोरात म्हणाले, दीर्घ उघडीपीमुळे शेतकरी अडचणीत आहे. या संकटसमयी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात समाधानकारक पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करतो.

या प्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही अण्णांबद्दल आदर व्यक्त केला. अण्णा हजारे हे आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. ते उपचारांनंतर पुन्हा राळेगणसिद्धीमध्ये परतल्याने दिलासा मिळाला असून त्यांचे मार्गदर्शन सर्वांना असेच सतत मिळत राहो, अशी भावना तांबे यांनी व्यक्त केली.

या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पद्मभूषण अण्णा हजारे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान मोलाचे असून स्वच्छ आणि पारदर्शक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. थोरात व तांबे यांच्या या भेटीमुळे आनंद वाटला.

या भेटीदरम्यान उपस्थित कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अण्णा हजारे, थोरात आणि डॉ. तांबे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 355
अण्णा हजारे बाळासाहेब थोरात सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

By Annant Ppangarkar29/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे…

गौण खनिज माफियांचा हैदोस; कारवाईसाठी गेलेल्या परिविक्षाधीन प्रांताधिकाऱ्यांना डंपरखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न

29/10/2026

गुरुवार २९ ऑक्टोंबर २०२६ — कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

29/10/2026

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.