Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर परिसरातील शेकडो एकर जंगल कथित प्रकल्पाच्या नावाखाली नष्ट केले जात असल्याचा गंभीर आरोप करत, या विनाशकारी जंगलतोडीला तात्काळ स्थगिती देण्याची जोरदार मागणी संगमनेर तालुक्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे.
या संदर्भात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढते तापमान, पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनता होरपळून निघत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांत तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत आटत चालले आहेत. अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश करणे चिंताजनक असून यामुळे स्थानिक पर्यावरण, जैवविविधता आणि वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये कर्जत व भीमाशंकर परिसरातील सुरु असलेली कथित जंगलतोड तात्काळ थांबवणे, या प्रकल्पासाठी करण्यात येणारी वृक्षतोड, पर्यावरणीय मंजुरी व वनविषयक परवानग्यांची उच्चस्तरीय चौकशी करणे समाविष्ट आहे.
तसेच नियमानुसार सर्व कायदेशीर परवानग्या मिळाल्याची खातरजमा करूनच पुढील कार्यवाही करावी, स्थानिक नागरिक व तज्ज्ञांची मते विचारात घेऊन प्रकल्पाचे निष्पक्ष पुनर्मूल्यांकन करावे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
निसर्ग आणि जंगलांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असून आज आपण योग्य पावले उचलली नाहीत, तर पुढील पिढ्यांना भीषण पाणीटंचाई आणि तीव्र हवामान बदलाचा सामना करावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर रवींद्र दिवे, ओंकार बिडवे, जयसिंग सहाने, रामू चन्ना, संदीप काकड, विश्वनाथ भुजबळ, अनिकेत घुले, समीर लामखडे, सचिन साळवे, रजत अवसक, किसनभाऊ हासे, हिरालाल पगडाल, कैफ तांबोळी, बादशहा सोनवणे आदी पर्यावरणप्रेमी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 127
संगमनेर #भीमाशंकर_जंगलतोड #कर्जत_जंगलतोड #पर्यावरण_संरक्षण #मुख्यमंत्र्यांना_निवेदन #देवेंद्र_फडणवीस #वृक्षतोड_विरोधात_आंदोलन #हवामान_बदल #महाराष्ट्र_संवाद_न्यूज
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By Annant Ppangarkar26/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर परिसरातील शेकडो एकर जंगल कथित…

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.