Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

26/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याची वा व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने आक्रमक पावले उचलली आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून २४ ऑक्टोबर २०२६ रोजी संगमनेर येथील ‘मेसर्स जगदंबा फूड प्रॉडक्ट्स’ या अन्न प्रक्रिया उद्योगावर धडक कारवाई करत प्रशासनाने तब्बल १५,००,५६६ रुपये मूल्याचा संशयास्पद, मिसब्रँडेड व कमी दर्जाचा अन्नसाठा जप्त केला आहे.
गुजरातच्या उंझा येथील ‘डी. ए. पटेल’ या पुरवठादाराकडून हा माल मागवण्यात आला होता, यामध्ये ८,९९,७०० रुपये किमतीची ५,९९८ किलो धने डाळ आणि ६,००,८६६ रुपये किमतीची ३,५९८ किलो बडीशेप असा एकूण ९,५९६ किलो साठा ताब्यात घेण्यात आला आहे.
राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, नाशिक विभागाचे संयुक्त आयुक्त माने आणि सहायक आयुक्त एस. एच. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी यु. आर. सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. जप्त केलेल्या साठ्याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत सुरू असलेली ही धडक मोहीम अशीच तीव्र गतीने सुरू राहणार असून, सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही विक्रेत्याची वा व्यावसायिकाची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 417
FDA Action Sangamne अन्न व औषध प्रशासन अहिल्यानगर न्यूज एफडीए छापा धने व बडीशेप जप्त संगमनेर बातमी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरात FDA चा दणका; फेस्टिव्हल ड्राईव्ह २०२६ अंतर्गत १५ लाखांचा संशयास्पद धने व बडीशेपसाठा जप्त!

By Annant Ppangarkar26/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न…

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.