Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण कधी अत्यंत भावूक तर कधी उत्साहाने भरून जात होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर पडलेले आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले मित्र तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आले. सुरुवातीला एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेला हा संपर्क व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉन्फरन्सपर्यंत पोहोचला. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सवर एकमेकांना पाहताना नावे सांगून ओळख पटवावी लागली, मात्र या अनोख्या भेटीने प्रत्येकाच्या डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले आणि मित्रभेटीची तीव्र ओढ निर्माण झाली.

या भावूक ओढीतूनच ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉटेल वसंतसुत, भंडारदरा या निसर्गरम्य ठिकाणी दोन दिवसीय भव्य गेट-टुगेदरचे आयोजन करण्यात आले. दिवसभरात रंधा फॉल व परिसरातील विविध पर्यटन स्थळांचा आनंद घेतल्यानंतर संध्याकाळी विशेष मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपल्यात नसलेल्या दिवंगत मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रामनाथ भालेकर यांनी ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा’ या स्वागतगीताने सर्व मित्रांचे मनःपूर्वक स्वागत केले.

मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने आपल्या बालपणातील गरिबीचा आवर्जून उल्लेख करत कुटुंबाविषयी माहिती दिली. शिक्षक म्हणून रुजू झालेले हे मित्र स्वकर्तृत्वावर आणि उच्च शिक्षणाच्या जोरावर मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांसारख्या उच्च पदांवरून सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल बोलताना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते.

कॉलेजच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना वातावरण कधी अत्यंत भावूक तर कधी उत्साहाने भरून जात होते. ज्या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य झाले नाही, त्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे या कार्यक्रमात थेट सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात संगीताची सुरेख मेजवानी पाहायला मिळाली. कॉलेजच्या दिवसांत गाजलेले संपत गायकर यांचे ‘आई तुझे लेकरू, वेड ग कोकरू’ हे गीत ऐकून सर्वांनी टाळ्यांच्या गजर केला. तर शिवाजी नागरे व अशोक विटनोर यांनी हार्मोनियमच्या साथीने सादर केलेल्या सुंदर भजनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकले. कार्यक्रमाच्या शेवटी संपत गायकर यांच्या गाण्यांवर आणि ‘झिंगाट’ गाण्याच्या तालावर सर्व सेवानिवृत्त मित्रांनी आपले वय विसरून मनमुराद डान्स करत आनंद लुटला.

या अत्यंत यशस्वी व अविस्मरणीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामनाथ भालेकर यांनी केले, तर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेणारे सुधाकर शेटे, वसंतराव लोखंडे आणि नामदेवराव पतंगे यांचा सर्वांच्या वतीने शाब्दिक सन्मान करण्यात आला.

या ऐतिहासिक स्नेह मेळाव्यात सुरेंद्र हातवळणे, तुकाराम वारकड, सुनील बोंडगे, दत्तात्रय मैड, संपत गायकर, भीमराज आंब्रे, विष्णू तागड, रामराव ढाकणे, शरद सुद्रिक, वाल्मीक शिंदे, दिनकर पारधी, मारुती गायकवाड, शिवाजी नागरे, अशोक विटनोर, आयुब इनामदार, योसेफ मकासरे, रावसाहेब चौधरी, सुरेश वडितके, वैजनाथ कर्डिले, रभाजी सोनावळे, अण्णासाहेब खतोडे, शिवाजी ठुबे आणि रावसाहेब सोनावणे आदी मित्र आवर्जून सहभागी झाले होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 156
भंडारदरा शिक्षक मित्र स्नेह मेळावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.