महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शांततेच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवर आणि नागरिकांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईच्या एका छायाचित्राने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. हिंदुस्थान टाईम्स मुंबईचे छायाचित्रकार राजू शिंदे यांनी टिपलेल्या या हृदयद्रावक फोटोवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे केवळ एक छायाचित्र नसून देशातील लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचे जिवंत निदान आहे, अशा शब्दांत राऊत यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेच ते छायाचित्र
https://www.facebook.com/share/p/1CiLNqcxKP/







