Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले
गुन्हेगारी

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी कारवाईची भीती दाखवून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने एका वनपालाला रंगेहात पकडले आहे. जहीर सिराज शेख (वय ४७) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित वनपालाचे नाव आहे.
रविवारी (दि. २५) दुपारी माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचून तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदाराची कोऱ्हाळे खुर्द येथे ४ हेक्टर शेतजमीन आहे. अलीकडील पावसामुळे शेतातील माती वाहून नीरा नदीत गेल्यामुळे त्यांनी नदीपात्रातील माती पुन्हा शेतात टाकण्याचे काम सुरू केले होते. मात्र, गत २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख यांनी हे काम कायदेशीर कारवाईची भीती दाखवून अचानक थांबवले. संबंधित जागा वनविभागाची असल्याचे सांगत मातीचा भराव सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शेख यांनी स्वतःसह सहकारी भूमरे मॅडम यांच्या नावाखाली १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराच्या दाव्यानुसार, या संपूर्ण लाचेच्या रकमेपैकी ४ हजार रुपये आधीच २६ सप्टेंबर रोजी स्वीकारण्यात आले होते. उर्वरित ६ हजार रुपयांच्या रकमेसाठी वारंवार तगादा लावून ही रक्कम दिल्यानंतरच काम सुरू देण्याची अट घालण्यात आली होती. या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने थेट पुणे एसीबी कार्यालयात अधिकृत तक्रार नोंदवली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत गत २३ ऑक्टोबर रोजी स्वतंत्र पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान वनपाल जहीर शेख यांनी यापूर्वी ४ हजार रुपये घेतल्याची कबुली देत, उर्वरित ६ हजार रुपयांची मागणी कायम ठेवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार, रविवारी एसीबीच्या पथकाने माळेगाव येथील हॉटेल शिवकृपा येथे अत्यंत गोपनीयतेने सापळा रचला. दुपारी ठरल्याप्रमाणे २ वाजून १७ मिनिटांनी तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जहीर शेख यांना पथकाने रंगेहात बेड्या ठोकल्या. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलमांतर्गत माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या गंभीर प्रकारामुळे वनविभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 97
#पुणेएसीबी #लाचलुचपत #महाराष्ट्रसंवाद #वनपालअटक #माळेगाव #भ्रष्टाचारविरोधीकारवाई #PuneACB #BaramatiBribe
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026

जामिनावर सुटताच मिरवणूक काढणे पडले महाग! ५ जण अटकेत, डीजे मालकही गजाआड; आरोपींची कायद्यानुसार तडीपारी होणार आणि जामीन रद्द करणार

24/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

By Annant Ppangarkar26/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी कारवाईची भीती दाखवून १० हजार रुपयांची…

सोमवार २६ ऑक्टोबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

26/10/2026

एसएमबीटीचा स्तुत्य उपक्रम | दोन वर्षात २४ डोहाळे जेवण; मोफत १८ हजार सोनोग्राफी आणि दोन हजार महिलांच्या प्रसूती

25/10/2026

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.