Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

यंदा तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेती पिके सुकू लागली असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/09/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची गरज विचारात घेऊन भंडारदरा धरणातून सोमवारपासून (१४ सप्टेंबर) पाण्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या निर्देशांमुळे संगमनेर तालुक्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

यंदा तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेती पिके सुकू लागली असून, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. तसेच गणेश विसर्जन आणि उत्सवाच्या दिवसांत पाण्याची उपलब्धता व्हावी, अशी मागणी शेतकरी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी लोणी येथील बैठकीत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे तात्काळ आवर्तन सोडण्याची आग्रही मागणी लावून धरली.

या मागणीची गांभीर्याने दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्याचे निर्देश दिले. पाणी सुटणार असल्याने सुकत चाललेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळणार असून विसर्जन सुलभ होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या अडचणी दूर करणाऱ्या या निर्णयाबद्दल आमदार अमोल खताळ यांनी विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 111
अमोल खताळ आवर्तन पाणी भंडारदरा धरण राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.