Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कामगिरी केली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

अहिल्यानगर:

स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडून एकाच दिवशी ६ विविध ठिकाणी यशस्वी छापे टाकले असून, यामध्ये सुमारे ५ लाख ९५ हजार ९१५ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू, गुटखा आणि माव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १५ आरोपींवर विविध कलमांन्वये एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदारांची चार विशेष पथके तयार केली होती. या पथकांनी शनिवारी (२९ ऑगस्ट) गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी, भिंगार कॅम्प, कर्जत आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकले.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्या कारवाईत १ लाख २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वडगाव गुप्ता येथील सचिन बबन डोंगरे (वय ४१) याला ताब्यात घेण्यात आले, तर मुकुंदनगरचा कय्युम शेख पसार झाला. याच हद्दीतील दुसऱ्या कारवाईत नागापूर येथील सतीश सुखदेव तोडमल (वय ३९) याच्याकडून २ हजार ५५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून अजझर पठाण फरार आहे.

भिंगार कॅम्प हद्दीत सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. तेथून ४ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत विळदघाट येथील ज्ञानेश्वर रमेश गायकवाड (वय ३६), नवनागापूरचा अमर शिवाजी ताठे (वय २३) आणि मुकुंदनगरचा शाफीन आरीफ शेख (वय २१) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत बीडचा ऋषी काटकर आणि झेंडीगेटचा अल्तमश सय्यद हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खेड येथील गोविंद काळुराम जाधव (वय २९) याच्याकडून २ हजार १६० रुपयांचा, तर उमर अस्लम शेख (वय २७) याच्याकडून २ हजार ४०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये भिगवण येथील धीरज कवितके आणि अभि कवितके हे फरार घोषित झाले आहेत. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिग्रस येथील शोएब महमंद शेख (वय ३६) याला अटक करून २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला, तर सोनईचा फारूक पठाण पसार झाला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कामगिरी केली असून, सर्व फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 383
अहिल्यानगर एलसीबी गुटखा छापे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.