Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट
सांत्वन

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावराचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/08/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

संगमनेर:

तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा वसंत पवार या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. कृष्णा हा बिबट्याच्या भीतीने पळताना शेततळ्यात पडल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दुःखाकुल पवार कुटुंबीयांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या अत्यंत कठीण प्रसंगी पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून शासनाकडून मिळणारी सर्व आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली.

कृष्णाच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून ही घटना मन हेलावून टाकणारी असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील बिबट्याच्या वाढत्या वावराचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे. मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या घटनेची सत्यता आणि वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सखोल तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. बिबट्याचा वावर असलेल्या भागात वनविभागाने केवळ पाहणी न करता तातडीने पिंजरे लावावेत आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नियमानुसार आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशा स्पष्ट सूचना आमदार खताळ यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या सांत्वन भेटीदरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी नम्रता हिरे, पोलीस उपनिरीक्षक विकास काळे यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 828
अमोल खताळ सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.