Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
यश / निवड / पुरस्कार

आदित्य कडलग यांची जागतिक विमा परिषदेसाठी ऐतिहासिक निवड; संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

आदित्य यांच्या या यशाचा पाया त्यांचे वडील आणि 'कडलग इन्व्हेस्टमेंट'चे संस्थापक सुनील कडलग यांच्या ३० वर्षांच्या समृद्ध अनुभवातून रचला गेला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/06/2026Updated:29/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेरचे युवा विमा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांची सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड झाली असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा ‘सीओटी’ आणि ‘एमडीआरटी’ सन्मान पटकावला आहे.
टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी असलेल्या आदित्य कडलग यांनी केवळ पाच महिन्यांत यंदाचे ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) मानांकन मिळवून आपल्या यशाचे सातत्य राखले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे सिंगापूर येथे २२ ते २५ ऑगस्ट २०२७ दरम्यान आयोजित होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत त्यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.
आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच पहिल्याच वर्षी एमडीआरटीचा बहुमान मिळवला होता, तर २०२४ मध्ये एकाच वर्षात सलग तीन वेळा एमडीआरटी करत जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित ‘सीओटी’ पुरस्कार मिळवणारे ते संगमनेरमधील पहिले विमा सल्लागार ठरले आहेत.
आदित्य यांच्या या यशाचा पाया त्यांचे वडील आणि ‘कडलग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक सुनील कडलग यांच्या ३० वर्षांच्या समृद्ध अनुभवातून रचला गेला आहे. सुनील कडलग यांनी विमा, म्युच्युअल फंड आणि आरोग्य विमा क्षेत्रात पारदर्शक सेवा देत मोठी विश्वासार्हता निर्माण केली असून, कोरोना काळात अनेक कुटुंबांना मृत्यू दावे आणि वैद्यकीय खर्चाची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते व वक्ते म्हणून परिचित असलेले सुनील कडलग हे जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि रोटरी क्लबच्या माध्यमातूनही सक्रिय आहेत. वडिलांच्या याच सामाजिक व व्यावसायिक वारशाचा आदर्श घेत आदित्य कडलग यांनीही ग्राहकांना आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे.
या अभूतपूर्व कामगिरीबद्दल आदित्य यांना टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे नाशिक शाखाधिकारी सचिन कोठारी, चीफ बिझनेस असोसिएट सुरज वानखेडे आणि त्यांच्या मातोश्री उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संगमनेर शहराच्या नावलौकिकात जागतिक स्तरावर भर घालणाऱ्या आदित्य कडलग यांच्या या यशाबद्दल सध्या सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 685
आदित्य कडलग कडलग इन्व्हेस्टमेंट पुरस्कार सुनील कडलग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

By Annant Ppangarkar08/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात गुरुवारी दुपारी एक अत्यंत…

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक अहिल्यानगर जिल्ह्यात; शेती व पाणी परिस्थितीचा घेणार आढावा

08/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.