Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

22/11/2026

पदापेक्षा जनतेचा विश्वास मोठा; अस्तगावात १०.४१ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

22/11/2026

‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर

22/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

१००० आसन क्षमतेच्या बंदिस्त नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांनी वाजणार तिसरी घंटा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणाऱ्या अत्याधुनिक कवी अनंत फंदी बंदिस्त नाट्यगृहाचे लोकार्पण सोमवारी (दिनांक २३ नोव्हेंबर) सायंकाळी ७ वाजता होणार आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाट्यप्रयोगांनी या नूतनीकरण झालेल्या रंगमंचाची तिसरी घंटा वाजणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली.
संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या एक हजार आसन क्षमतेच्या अद्ययावत वास्तूमुळे शहरातील नाट्यरसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या लोकार्पण सोहळ्याला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि शहरातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पाबाबत माहिती देताना डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात या बंदिस्त नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून राज्यातील विविध नाट्यगृहांचा अभ्यास केला आणि त्यातील सर्वोत्तम आधुनिक सुविधांचा समावेश या वास्तूत केला आहे.
संगमनेरला कवी अनंत फंदी यांच्यापासून शाहीर विठ्ठल उमप, कांताबाई सातारकर आणि पद्मश्री रघुवीर खेडकर यांसारख्या दिग्गज कलावंतांची मोठी परंपरा लाभली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील कलावंतांना नेहमीच हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, हे नवे नाट्यगृह तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळीला अधिक बळकटी देईल.
नाट्यगृहाच्या उद्घाटनानिमित्त दोन दिवस दर्जेदार नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २३) रात्री ८ वाजता ‘शिकायला गेलो एक’, तर मंगळवारी (दि. २४) रात्री ८ वाजता ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या नाटकांचे प्रयोग सादर होणार आहेत. या दोन्ही नाटकांच्या तिकीट विक्रीतून जमा होणारी संपूर्ण रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘दुष्काळ निधी’ला सुपूर्द केली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला नागरिक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे यांनी केले आहे.

तालुका स्तरावरील सर्वात अद्ययावत नाट्यगृह ठरणार
राज्याला आणि देशाला अनेक नामवंत कलाकार देणाऱ्या संगमनेर शहरात उभे राहिलेले कवी अनंत फंदी नाट्यगृह हे तालुका स्तरावरील अत्यंत वैभवशाली आणि अद्ययावत नाट्यगृह ठरणार आहे. एक हजार आसन क्षमता, भव्य रंगमंच, आधुनिक प्रकाशयोजना (लाईट डेकोरेशन), सुसज्ज प्रेक्षक गॅलरी आणि प्रशस्त पार्किंग अशा सर्व सुविधांनी युक्त असलेली ही वास्तू संगमनेरचा सांस्कृतिक मानबिंदू ठरेल.- आमदार सत्यजित तांबे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 59
एका लग्नाची पुढची गोष्ट कवी अनंत फंदी नाट्यगृह दुष्काळ निधी प्रशांत दामले बाळासाहेब थोरात मराठी नाटक मैथिली तांबे शिकायला गेलो एक संगमनेर नगरपरिषद संगमनेर बातम्या सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

By Annant Ppangarkar22/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणाऱ्या अत्याधुनिक कवी…

पदापेक्षा जनतेचा विश्वास मोठा; अस्तगावात १०.४१ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण

22/11/2026

‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर

22/11/2026

रविवार विशेष- दिवंगत दादांच्या टाळूवरचं लोणी ओरपणारी बांडगुळं

22/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.