Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर

22/11/2026

रविवार विशेष- दिवंगत दादांच्या टाळूवरचं लोणी ओरपणारी बांडगुळं

22/11/2026

रविवार विशेष- राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला नवी ऊर्जा; मोदी सरकारच्या आभासी विकासाचा बुरखा आता फाटू लागला!

22/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर
गुन्हेगारी

‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर

श्रीरामपूरचे ऑफर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
कमी कालावधीत अधिक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्हेस्टर’ कंपनीच्या प्रकरणातील फरार आरोपींची ठोस माहिती देणाऱ्या नागरिकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन’ यांच्याकडून पोलीस प्रशासनाच्यावतीने हे बक्षीस जाहीर झाले असून, श्रीरामपूर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत काही ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर शिवार (ता. श्रीरामपूर) येथे ‘ग्रो-इन्हेस्टर’ कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर व परिसरातील नागरिकांकडून मोठ्या परताव्याचे आमिष देऊन रकमा स्वीकारल्या जात होत्या. या माहितीच्या आधारे तक्रारीची वाट न पाहता अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
या पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६, रा. हनुमानवाडी, भोकर शिवार, ता. श्रीरामपूर) याच्या राहत्या घरावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत १ लाख ४ हजार ६०० रुपये रोख रकमेसह ९ पासबुक, १० चेकबुक, १ हिशेब नोंदवही, १ ॲपल लॅपटॉप, ३ कॉम्प्युटर स्क्रीन, २ पेन ड्राईव्ह, १ कॅश काउंटिंग मशीन, २ तिजोऱ्या, ३ वॉकीटॉकी आणि १ एचएचएमडी (H.H.M.D.) असा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने आरोपीने काही ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या असल्या तरी अद्याप काही गुंतवणूकदारांचे पैसे परत करणे बाकी आहे. सध्या दोन्ही आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
अमोघ संदिप कपाटे (वय २४, रा. हनुमानवाडी, भोकर, ता. श्रीरामपूर) आणि संदिप मोहिनीराज कपाटे (वय ३६, रा. हनुमानवाडी, भोकर, ता. श्रीरामपूर) अशी फरार आरोपींची नावे आहेत. या दोघांबाबत खात्रीशीर व तपासासाठी उपयुक्त माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, तसेच माहिती खरी ठरल्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
आरोपींची फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच आरोपींना पळून जाण्यास मदत किंवा आश्रय देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय अल्पवधीत दुप्पट किंवा तिप्पट परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नयेत, असा इशाराही देण्यात आला आहे. आरोपींबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक सतिश डौले (श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे – ९६६५४३१४१५), पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे (अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर – ७०२११२७७९४) किंवा श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम (७४९९०४६३६४) यांच्याशी संपर्क साधावा.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 97
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर मुरूम वाहतूक व जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी टोळीवर अप्पर पोलीस अधीक्षकांची ‘मकोका’च्या धर्तीवर बीएनएस कलम १११ अन्वये कारवाई

20/11/2026

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

‘ग्रो-इन्हेस्टर’ गुंतवणूक फसवणूक प्रकरण: फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस जाहीर

By Annant Ppangarkar22/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कमी कालावधीत अधिक परताव्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक…

रविवार विशेष- दिवंगत दादांच्या टाळूवरचं लोणी ओरपणारी बांडगुळं

22/11/2026

रविवार विशेष- राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला नवी ऊर्जा; मोदी सरकारच्या आभासी विकासाचा बुरखा आता फाटू लागला!

22/11/2026

आज रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ — आजचा तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

22/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.