Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार
गुन्हेगारी

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदिश मोरे यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथकाने केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) मुंबई पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर सापळ्याचा संशय आल्याने एक पोलीस शिपाई रकमेसह पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
हरेश्वर यशवंत शेंडे (वय २६, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक, व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) असे ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे, तर धनंजय दिलीप वायसे (व्ही. पी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई) हा पसार झालेल्या आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे.
व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास हरेश्वर शेंडे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या आईविरोधात गुन्हा नोंद होता. तपासात आरोपींना मदत करण्यासाठी शेंडे यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने १६ आणि १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये हरेश्वर शेंडे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रचलेल्या सापळ्यादरम्यान शेंडे यांनी ही रक्कम पोलीस शिपाई धनंजय वायसे याच्याकडे देण्यास सांगितले. वायसे याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली, परंतु लाचलुचपतच्या सापळ्याचा संशय आल्यानंतर तो लाचेच्या रकमेसह घटनास्थळावरून पळून गेला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई विभागात गुन्हा क्रमांक ३६/२०२६ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७, १२ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी आरोपी हरेश्वर शेंडे याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदिश मोरे यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथकाने केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 91
एसीबी गुन्हा गुन्हेगारी लाच लुचपत सापळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026

संगमनेरात गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

By Annant Ppangarkar19/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गुन्ह्याच्या तपासात आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या…

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.