Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून महसूल प्रशासनाच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाई सत्रामुळे अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत खांडगाव आणि निमज परिसरातून लाखों रुपयांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खांडगाव येथील फाट्यापासून खांडेश्वर मंदिर रोडच्या आतील बाजूस एका ठिकाणी विनापरवाना मोठा वाळूसाठा करून ठेवल्याची गुप्त माहिती महसूल पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदार कार्यालयाच्या भरारी पथकाने आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी खांडगाव परिसरात छापा टाकून पाहणी केली.
यावेळी मंगेश बाबू केदारी याच्या मालकीच्या जमिनीवर कोणतीही पूर्वपरवानगी किंवा परवाना नसताना प्रवरा नदीपात्रातून अनधिकृतपणे उपसा करून आणलेला सुमारे १०० ब्रास वाळूसाठा आढळून आला. या जप्त केलेल्या ६ लाख रुपये किमतीच्या वाळूसाठ्याबाबत विचारणा केली असता कोणतीही कागदपत्रे किंवा परवाने सादर करता आले नाहीत.
पंचासमक्ष हा वाळूसाठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, संगमनेर तालुक्यातील निमज येथील फॉरेस्ट गट क्रमांक ३९ मध्ये प्रवरा नदीपात्रातून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू उत्खनन करून साठा केल्याचे समोर आले. महसूल पथकाने केलेल्या पेट्रोलिंग दरम्यान निमज येथील विद्यानगर ते साकुरी वस्ती रस्त्याच्या पूर्व बाजूला डोंगराच्या पायथ्याशी हा प्रकार उघडकीस आला.
या ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसताना चैतन्य उर्फ चेतन सूर्यभान साकुरे याने सुमारे २० ते २५ ब्रास ओल्या वाळूचा साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत अंदाजे १२ हजार रुपये किमतीचा २० ब्रास वाळूसाठा जप्त करून सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राम महसूल व पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आला.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून महसूल प्रशासनाच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाई सत्रामुळे अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 4
कारवाई गुन्हे धीरज मांजरे वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

संगमनेरात गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

By Annant Ppangarkar18/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि साठवणुकीविरुद्ध महसूल प्रशासनाने कठोर पावले…

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026

आज बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.