Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

संगमनेरात गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल

17/11/2026

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

17/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

एकूण १२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शासकीय महसुलाचे नुकसान करणाऱ्या आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. - धीरज मांजरे, तहसीलदार संगमनेर.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने लक्षवेधी धडक कारवाई करीत वाळू तस्करांविरोधात उघडलेल्या मोहिमेत चार गुन्हे दाखल करून सुमारे ५० वाळूतस्करांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षातील महसूल विभागाची ही मोठी कारवाई ठरली आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत काही अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्याचा फायदा उठवत वाळूतस्करांनी प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारच्या जनता दरबारात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आढावा बैठकीत दिलेल्या कठोर कारवाईच्या निर्देशांनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल पथकांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संगमनेर खुर्द, रहिमपूर व साकूर येथे महसूल विभागाने धडक कारवाया केल्या.
संगमनेर खुर्द येथील छोट्या पुलाजवळ गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पश्चिम बाजूस सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महसूल विभागाने केलेल्या कारवाईत अंदाजे १८० ब्रास वाळूसाठा व दोन जेसीबी यंत्रे आढळून आली. या प्रकरणी पाच व्यक्तींविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईत तहसीलदार धीरज मांजरे, मंडळ अधिकारी विश्वजित चौगुले, ग्राम महसूल अधिकारी पारधी, संतोष लंके, आशुतोष वाकडे, गणेश सोनवणे, पांडुरंग भुरे, ग्राम महसूल सेवक गावपावसा, ग्राम महसूल सेवक चंदनापुरी, पोलीस पाटील संगमनेर खुर्द व ग्राम महसूल सेवक संगमनेर बुद्रुक सहभागी झाले होते.
रहिमपूर परिसरात मंगळवारी (१७ नोव्हेंबर) पहाटे ५.५५ वाजता तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. रहिमपूर-मोनोली रस्त्यावर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विनानोंदणी क्रमांकाची टाटा पिकअप महसूल पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने महसूल वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केला, तर तहसीलदार यांच्या वाहनाने वाळूने भरलेले जेनॉन वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या वाहनाने तहसीलदार यांच्या वाहनाला कट मारून पलायन केले. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी बाळकृष्ण विक्रम साळवे यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात सौरभ बन्सी गुडवे, विशाल नानासाहेब गुडवे व युवराज दिलीप वाळुंज यांचा समावेश आहे.
तसेच रहिमपूर येथील बंधाऱ्याजवळ प्रवरा नदीपात्रात ३८० ते ४०० ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले असून घटनास्थळी तीन टाटा पिकअप व एक ट्रॅक्टर आढळून आले. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी प्रवीण गजानन ढोले यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात सात व्यक्ती व २५ ते ३० अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सौरभ बन्सी गुडवे, विशाल नानासाहेब गुडवे, दत्तात्रय सुखदेव शिंदे, अक्षय भाऊसाहेब गुडवे, अमोल बाळासाहेब मोरे, सुनील लक्ष्मण पाटोळे व युवराज दिलीप वाळुंज यांचा समावेश असून या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी प्रवीण ढोले, बालकृष्ण साळवे, राजेंद्र खेमनर, ओमप्रकाश गाडेकर व महसूल सेवक अश्विनी पुड्रुक गाडेकर सहभागी झाले होते.
साकूर-मांडवे रस्त्यावर मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून घारगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. या प्रकरणी साकूरचे ग्राम महसूल अधिकारी सोमनाथ शेरमाळे यांनी ट्रॅक्टरमालक अजहर रफीक पाटील व चालक अमित रावसाहेब कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून, या कारवाईत नायब तहसीलदार संदीप भांगरे, महसूल सहाय्यक पिराजी भडकवाड व वाहनचालक राजेश गुंजाळ सहभागी झाले होते.


संगमनेर खुर्द, रहिमपूर व साकूर येथील चार स्वतंत्र प्रकरणांमध्ये सुमारे ५० वाळूतस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत दोन जेसीबी यंत्रे, रहिमपूर येथील वाळू वाहतुकीशी संबंधित वाहने आणि साकूर येथील ट्रॅक्टर यांसह एकूण १२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शासकीय महसुलाचे नुकसान करणाऱ्या आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. – धीरज मांजरे, तहसीलदार संगमनेर.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 60
कारवाई गुन्हे धीरज मांजरे महसूल विभाग वाळू तस्करी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १४०० किलो गोमांसासह ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

भाऊबीज : ओवाळणीच्या ताटापलीकडचे बहिणीच्या प्रेमाचे ऋण!

10/11/2026

दिवाळीच्याच दिवशी अकोले रोडवर बॅटरी दुकानाला भीषण आग; फटाक्यांची एक ठिणगी अन् क्षणात —!

09/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर तालुक्यात महसूल विभागाचा दणका; ५० वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करत ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात महसूल विभागाने लक्षवेधी धडक कारवाई करीत वाळू तस्करांविरोधात उघडलेल्या…

संगमनेरात गोवंश कत्तलीवर धडक कारवाई; ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल

17/11/2026

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

17/11/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १४०० किलो गोमांसासह ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.