Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

17/11/2026

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १४०० किलो गोमांसासह ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा हुंकार जपण्याचा निर्धार; संगमनेरमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!

17/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला
राजकारण

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यात सध्या प्रत्यक्ष विकासकामांपेक्षा गावोगावी बॅनरबाजी करून विकास झाल्याचे आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार अमोल खताळ यांनी या दिखाऊपणातून बाहेर पडून प्रत्यक्ष विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सडेतोड सल्ला माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे.
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विकासकामांवर स्वतःच्या नावाचे लेबल लावून श्रेय लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप वर्पे यांनी केला. तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रयत्नांतून सुरू असलेल्या कामांचेही श्रेय स्वतःकडे घेऊन टेंभा मिरवणे थांबवावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वडगावपानमधील ॲसिड हल्ल्याचा आरोपी अजूनही मोकाट असल्याचा मुद्दा उपस्थित करताना केवळ भाषणबाजी आणि आश्वासनांपेक्षा कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर ठोस कृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावोगावी आश्वासित करण्यात आलेले रस्ते अखेरची घटका मोजत आहेत. दुष्काळी परिस्थितीत वीज आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा छावण्यांची अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तालुक्यातील जनतेला रस्ते, पाणी, वीज, शेती आणि रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर हवे आहे. मात्र, विकासाच्या प्रश्नांऐवजी जिरवाजिरवीचे राजकारण, कार्यक्रमबाजी आणि ‘बघून घेतो’, ‘बंदोबस्त करतो’ अशा पोकळ धमक्यांतून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रकार सुरू असल्याचा टोला वर्पे यांनी लगावला.
आमदारांनी वेळीच आत्मपरीक्षण करून हमरीतुमरीच्या राजकारणापेक्षा विकासात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारावा. लोकशाहीत जनतेच्या निर्णयाचा आदर ठेवून लोकांच्या अपेक्षांनुसार काम करावे. विरोधकांशी संघर्ष करण्यापेक्षा तालुक्याच्या विकासासाठी निधी आणणे आणि मंजूर कामे मार्गी लावणे याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बाकी राजकीय लढाई २०२९ मध्ये होईलच; मात्र तोपर्यंतचा काळ हा बॅनरबाजी, श्रेयवाद आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये वाया न घालवता निधी, विकासकामे आणि संगमनेर तालुक्याच्या प्रगतीसाठी वापरावा. राजकारण निवडणुकीपुरते आणि विकास जनतेसाठी असतो, याचे भान आमदारांनी ठेवावे, असा सल्ला आनंद वर्पे यांनी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 67
अमोल खताळ टीका राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा हुंकार जपण्याचा निर्धार; संगमनेरमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!

17/11/2026

मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण, मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना माझे प्राधान्य: आमदार अमोल खताळ

17/11/2026

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात सध्या प्रत्यक्ष विकासकामांपेक्षा गावोगावी बॅनरबाजी करून विकास झाल्याचे आभासी…

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; १४०० किलो गोमांसासह ४.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

17/11/2026

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा हुंकार जपण्याचा निर्धार; संगमनेरमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!

17/11/2026

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे : एक विचार, एक संघर्ष आणि लाखो शिवसैनिकांची प्रेरणा!

17/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.