Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026

आज मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६; आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

17/11/2026

जोर्वे येथे घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

16/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…
राजकारण

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल तर अनेक राजकीय नेत्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढणे किंवा कुणाला लक्ष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, आमदार रोहित पवार यांना संयमाचा सल्ला दिला आहे.
सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावरील आपल्या विस्तृत पोस्टमधून राजकारणातील वाढत्या निष्ठूर प्रवृत्तीवर बोट ठेवले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे आणि परस्परांमधील विश्वासाचे नाते आपण अतिशय जवळून पाहिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांतील राज्याच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांमध्ये अजितदादांनी देवेंद्रजींना खंबीर साथ दिली. अनेकदा स्वतःच्या राजकीय सोयीपेक्षा दिलेला शब्द महत्त्वाचा मानून, स्वकीयांचा विरोध पत्करूनही त्यांनी देवेंद्रजींच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. देवेंद्र स्वतः नको म्हणत असतानाही ‘मी शब्द दिला आहे आणि तो पाळणारच,’ अशी ठाम भूमिका घेणारे अजितदादा होते, असे सांगत तांबे यांनी त्यांच्या स्वभावाचे मोठेपण अधोरेखित केले.
अशा संवेदनशील आणि दुर्दैवी अपघाती निधनानंतर कोणताही ठोस आधार नसताना या अपघाताला देवेंद्रजींशी जोडण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गंभीर आणि निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा संवेदनशील प्रसंगाचे राजकीय भांडवल करणे अत्यंत चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. पुढे बोलताना त्यांनी आमदार रोहित पवार यांना उद्देशून म्हटले की, एका अभ्यासू, बुद्धिमान आणि तरुण आमदार म्हणून तुमची ओळख निर्माण व्हायला हवी. तुमच्याकडे राजकीय महत्त्वाकांक्षा आणि क्षमता आहे, परंतु प्रत्येक विषयावर तात्काळ प्रतिक्रिया देणे, प्रत्येक गोष्टीवर टीका-टिप्पणी करणे आणि जणू काही संपूर्ण राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात वावरणं योग्य नाही.
राजकारणात काम करताना प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात आणि त्या असण्यात काहीही गैर नाही, मात्र या प्रवासात आपण आपली राजकीय आणि वैयक्तिक मर्यादा ओलांडणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असे तांबे यांनी नमूद केले. एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर त्याच पिढीतील एक सहकारी आणि मित्र म्हणून थोда सबुरीने घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येक विषयात व्यक्त होण्यापूर्वी त्याचे गांभीर्य, परिणाम आणि वेळ यांचा विचार करावा, राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि काही संधी काळानुरूप आपोआप मिळत असतात, त्यामुळे अनावश्यक घाई करण्यापेक्षा संयम, अभ्यास आणि सातत्य यांना अधिक महत्त्व द्यावे, असे त्यांनी सुचवले.
तसेच, एका फोटोवरून जर एवढी टीका-टिप्पणी करायची असेल तर अनेक राजकीय नेत्यांचे त्यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे निवडक फोटो समोर आणून त्यावरून राजकीय निष्कर्ष काढणे किंवा कुणाला लक्ष्य करणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 67
अजित पवार अजित पवार मृत्यू प्रकरण आरोप ट्विटर देवेंद्र फडणवीस राजकारण राजकीय रोहित पवार सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

टंचाई निवारण कामांचा लेखाजोखा घेणार; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासनाला कडक इशारा

14/11/2026

आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन वितरणात मिळणार प्राधान्य

14/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर…

आज मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६; आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

17/11/2026

जोर्वे येथे घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लांबवली

16/11/2026

आजच्या म्हणजेच १६ नोव्हेंबर २०२६ चे राशिभविष्य

16/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.