महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात दत्तदिमंदिराजवळ एका जुन्या घरात घरफोडीची घटना घडली आहे.
योगेश शांताराम जोशी (वय ३६ वर्षे, व्यवसाय: शेती, रा. जोर्वे, ता. संगमनेर, जि. अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दिनांक १४ नोव्हेंबर) रात्री नऊ ते १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरांनी गावातल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे सुरक्षा भिंतीच्या आत असलेल्या जुन्या घराच्या सुरक्षा भिंतीवरून आत प्रवेश केला.
कडी लावलेल्या दरवाज्याची कडी काढून कपाटाच्या लॉकचे नुकसान करत चोरांनी कपाटात कापडी पिशवीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि वैयक्तिक रोख रक्कम असा एकूण ४२,५०० रुपयांचा माल चोरून नेला.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल गुंजाळ करत आहेत.