Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टंचाई निवारण कामांचा लेखाजोखा घेणार; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासनाला कडक इशारा
राजकारण

टंचाई निवारण कामांचा लेखाजोखा घेणार; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासनाला कडक इशारा

जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर 'हायड्रोपोनिक्स' तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात व कमी पाण्यात चारा निर्मितीचा प्रयोग राबवला जात आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या उपाययोजनांच्या सूचनांची नेमकी किती अंमलबजावणी झाली, याचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील येत्या २२ नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुक्याचा पुन्हा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते थेट शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून राहिलेल्या समस्यांवर तातडीने मार्ग काढणार आहेत.
प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित जनता दरबारात ना. विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची व विविध गावांच्या शिष्टमंडळांची निवेदने स्वीकारून त्यांनी समस्या जाणून घेतल्या व अनेक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सार्वजनिक कामांबाबत अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ती वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीबाबत सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला असून, उपाययोजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला. सद्यस्थितीत मागणीनुसार टँकर सुरू करण्यात आले असून, पाण्याच्या उद्भवाच्या ठिकाणी फिल्टर प्लांट बसवण्याला प्राधान्य दिले जात आहे.
शेतकऱ्यांची पाण्याची मागणी रास्त असली तरी धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी हंगामासाठी आवर्तनाचे वेळापत्रक निश्चित झाले असून, जलसंपदा विभागाने त्यानुसार कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याची दक्षता गावपातळीवर तलाठी आणि ग्रामसेवकांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी, असे सांगतानाच यापुढे ज्या भागातून वाळू उपसा होईल तेथील जबाबदार अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा कडक इशारा पालकमंत्र्यांनी दिला. सरकारची प्रतिमा प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असल्याने दुष्काळी काळात कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या धर्तीवर ‘हायड्रोपोनिक्स’ तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात व कमी पाण्यात चारा निर्मितीचा प्रयोग राबवला जात आहे. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या (DPDC) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही ना. विखे पाटील यांनी यावेळी दर्शवली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 314
जनता दरबार राजकारण राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

आमदार अमोल खताळ यांच्या तत्परतेने संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रेशन वितरणात मिळणार प्राधान्य

14/11/2026

आमदार सत्यजीत तांबेंच्या अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाहीच्या सूचना! जनता दरबारात नेमकं काय घडलं?

14/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

By Annant Ppangarkar15/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.