Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

15/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात
आंदोलन

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

किसान सभेच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, यशवंत झाडे, उमेश देशमुख आणि सदाशिव साबळे यांनी दिला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिलांच्या योजनांचे मानधन रखडल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल ठरले असून, किसान सभेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते, मात्र अनेक दिवस लोटूनही ही मदत मिळाली नाही. तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीचे तीन हप्ते थकीत असून, लाडकी बहीण योजनेतील ८१ लाख महिलांचे मानधन बंद झाले आहे आणि नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अद्याप प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही.
अकोले ते मुंबई काढलेल्या भव्य वाहन मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सकारात्मक आश्वासने दिली होती, परंतु अद्याप अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारे अपुरे भाव आणि कर्जबाजारीपणा यांमुळे शेतकरी आधीच संकटात सापडले आहेत. सरकारने वेळकाढूपणा न करता सर्व घोषणांची आणि आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा किसान सभेच्या वतीने संपूर्ण ताकदीनिशी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, डॉ. अजित नवले, यशवंत झाडे, उमेश देशमुख आणि सदाशिव साबळे यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 189
अजित नवले आंदोलन किसान सभा लाडकी बहीण शेतकरी मदत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

सरकारला सत्तेचा भस्म्या! लोकशाहीची क्रूर हत्या; संगमनेरमध्ये धगधगले संतापाचे लोळ! आरजीएसएसचा ‘तो’ फलक चर्चेत…

08/11/2026

माश्यांचा प्रादुर्भाव अन् आजारांची भीती! पोल्ट्री फार्मविरोधात आक्रमक पवित्रा, थेट तहसीलदारांना निवेदन

22/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

राष्ट्रीय स्तरावर संगमनेरच्या ‘अमृतवाहिनी’चा दुहेरी डंका! गोव्यात आयएसटीईच्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरव; ‘बेस्ट ग्रीन कॅम्पस’ अन् ‘बेस्ट इनोव्हेशन’वर कोरले नाव

By Annant Ppangarkar15/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शैक्षणिक गुणवत्ता, नवसंशोधन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या…

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

५० लाख शेतकरी आणि ८१ लाख महिला मदतीपासून वंचित; किसान सभा आंदोलनाच्या पवित्र्यात

15/11/2026

सकाळीच महिला शिक्षिकेच्या गळ्यातून दीड तोळ्याची मिनी गंठण लांबवून चोरटे पसार; संगमनेरात या रस्त्यावरील घटना

15/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.