महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमध्ये शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त माजी पदवीधर आमदार सुधीर तांबे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
संगमनेर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने नवीन रोड (इंदिरा गांधी मार्ग) आणि बस स्थानकासमोर आज मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना तालुकाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शहरप्रमुख अमित चव्हाण यांनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी, स्वाभिमानासाठी आणि हिंदुत्वाच्या विचारांसाठी केलेला संघर्ष व त्यांचे निर्भीड नेतृत्व सदैव प्रेरणादायी राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमास अकोले जिल्हा संघटक अमोल बोऱ्हाडे, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय गुंजाळ, उपजिल्हा संघटक रवींद्र कानकाटे, उपतालुकाप्रमुख दीपक मुळे, उपतालुकाप्रमुख योगेश खेमनर, आश्वी गटाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, विधानसभा शहरप्रमुख बाळासाहेब घोडके, शहरप्रमुख फैसल सय्यद, युवासेना विभागप्रमुख अमोल डुकरे, माजी शहरप्रमुख आसिफ तांबोळी, उपशहरप्रमुख वाहिद शेख, रिक्षासेना तालुकाप्रमुख अशोक बडे, अजीज मोमीन, बाळासाहेब कवडे, अपंग सेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, योगेश बिचकर, उपशहरप्रमुख परवेज शेख, अजीम अत्तार, युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे, तालुका संघटक राजू सातपुते, शहरसंघटक दीपक साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजय सातपुते तसेच संभव लोढा व मुस्लिम मावळा अजीज मोमिन यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.