Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026

बाळासाहेब ठाकरे: काळाच्या पडद्यावर उमटलेले वादळी व्यक्तिमत्त्व!

17/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश
बैठक

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

गुन्हेगारीला वेळीच लगाम घालण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषदेने समन्वयाने काम करावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आमदार सत्यजीत तांबे थेट अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सोमवारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये विशेष बैठक घेत पोलिसांना धारेवर धरले. गुन्हेगारांचा तातडीने बंदोबस्त करा, अन्यथा खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी विनानंबर प्लेट वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी दुष्काळी परिस्थितीची झळ पाहता चोरी व घरफोड्यांच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुन्हेगारीला वेळीच लगाम घालण्यासाठी पोलीस आणि नगरपरिषदेने समन्वयाने काम करावे, असे निर्देश आमदार तांबे यांनी दिले.
शहराच्या सुरक्षेसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून १५० हून अधिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियंत्रण थेट पोलीस स्टेशन आणि पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये दिले आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या यंत्रणेचा अपेक्षित वापर होत नसल्याचे बैठकीत उघड झाले.
स्ट्रीटलाईटवरून घेतलेल्या वीजजोडणीचे नियंत्रण थेट मुंबईतून होत असल्याने सीसीटीव्ही आणि सिग्नल यंत्रणा विस्कळीत होत होती. आमदार तांबे यांनी तातडीने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे नियंत्रण स्थानिक पातळीवर आणले आणि सर्व कॅमेरे पुन्हा कार्यान्वित करून घेतले.
पोलीस प्रशासनाकडे असलेली मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता लक्षात घेता, नगरपरिषदेने उभारलेल्या स्वतंत्र ‘रक्षक दला’चा प्रभावी वापर करण्याच्या सूचना तांबे यांनी केल्या. या दलाचे १२ जवान, दोन गाड्या आणि दोन बुलेटच्या साहाय्याने शहरात नियमित गस्त घालतात. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यासाठी पोलिसांनी या रक्षक दलाची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
अलीकडील घरफोड्यांमध्ये विनानंबर प्लेट वाहनांचा वापर होत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. त्यामुळे शहरात आणि तालुक्यात विनानंबर प्लेट वाहन दिसताच संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश तांबे यांनी दिले. यासोबतच नवीन नगर रोडवरील वाहतूक कोंडी, पार्किंग आणि सिग्नल व्यवस्थेवरही बैठकीत चर्चा झाली.
बांधकाम परवानगी घेताना पार्किंगची जागा दाखवून प्रत्यक्षात तिचा वापर न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. डॉक्टर, हॉस्पिटल्स, मॉल्स, बँका आणि मोठ्या दुकानदारांनी ग्राहकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व कर्मचारी नेमावेत, रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची जबाबदारी त्यांनीही स्वीकारावी, असे सांगत पुढील आठवड्यात या सर्व आस्थापनांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे तांबे यांनी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 84
चोऱ्या बैठक रक्षक दल वाहतूक शहर पोलीस सत्यजित तांबे सिग्नल सीसीटीव्ही कॅमेरा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

आमदार सत्यजीत तांबेंच्या अधिकाऱ्यांना जागेवरच कार्यवाहीच्या सूचना! जनता दरबारात नेमकं काय घडलं?

14/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
बैठक

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या घरफोड्या आणि गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे…

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026

बाळासाहेब ठाकरे: काळाच्या पडद्यावर उमटलेले वादळी व्यक्तिमत्त्व!

17/11/2026

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.