Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण, मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना माझे प्राधान्य: आमदार अमोल खताळ

17/11/2026

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण, मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना माझे प्राधान्य: आमदार अमोल खताळ
राजकारण

मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण, मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना माझे प्राधान्य: आमदार अमोल खताळ

एकनाथ शिंदे आणि विखे पाटलांच्या पाठबळावर विरोधकांना विकासातून उत्तर देणार
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले, आपण मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना प्राधान्य देत आहोत असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच सभा मंडपासह जगदंबामाता मंदिर अशा सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात लवकरच जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार असून, गावोगावी बंधाऱ्यांची दुरुस्ती व खोलीकरण करून पाणीसाठा वाढविण्यावर भर दिला जाईल. आपण कशा पद्धतीने काम करतो यापेक्षा केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये पाण्याचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला आहे. जनतेने घेतलेला परिवर्तनाचा निर्णय योग्य असल्याचे विकासकामांच्या माध्यमातून सिद्ध करणे, ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षांत तालुक्यातील प्रत्येक गावाशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असून, देवकौठे गावाच्या सुख-दुःखात आपण नेहमीच सहभागी राहिलो आहोत. उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी संगमनेरच्या जनतेवर मोठा विश्वास दाखविला आहे. विरोधकांकडून आपल्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्वसामान्य जनता पाठीशी असेपर्यंत आपल्याला कोणाचीही भीती नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ न देता विकासाच्या माध्यमातूनच विरोधकांना उत्तर देणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे देवकौठे परिसरातील बंधारे पुन्हा भरणार असून, शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा शब्द राज्य सरकारने दिला असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीप्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे खताळ यांनी सांगितले. तसेच, दुष्काळामुळे आपण सत्कार स्वीकारणे बंद केले असले तरी, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते सन्मान होत असल्याने हा सत्कार स्वीकारल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करावे, असे आवाहन आमदार खताळ यांनी केले. गावात गटबाजी किंवा गैरसमज निर्माण करण्याच्या प्रयत्नांना बळी न पडता गावाच्या विकासासाठी एकत्र यावे. गावातील कोणत्याही अडचणी शाखाप्रमुखांनी तात्काळ सोडवाव्यात आणि प्रश्न न सुटल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 52
अमोल खताळ विकास कामे विकास कामे भूमिपूजन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अजितदादांच्या निधनाचे राजकारण नको! आमदार सत्यजित तांबे संतापले; प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची घाई करू नका…

17/11/2026

नाशिक-पुणे रेल्वेचा अंतिम निर्णय कधी? ६० दिवसांची मुदत संपली, समितीचा अभ्यास अद्याप सुरूच; जनसुनावणीसाठी आमदार सत्यजीत तांबे आग्रही

15/11/2026

टंचाई निवारण कामांचा लेखाजोखा घेणार; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रशासनाला कडक इशारा

14/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण, मात्र जमिनीत पाणी जिरविण्याला आणि विकासकामांना माझे प्राधान्य: आमदार अमोल खताळ

By Annant Ppangarkar17/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मागील काळात केवळ माणसांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण झाले, आपण मात्र जमिनीत…

संगमनेरकरांच्या सुरक्षेसाठी तांबे ॲक्शन मोडमध्ये; गुन्हेगारांचा बंदोबस्त करा, पोलिसांना सक्त ताकीद! पोलिसांच्या मदतीला पालिकेचे ‘रक्षक दल’; विनानंबर प्लेट वाहनांवर कारवाईचे आदेश

17/11/2026

न्यायदान प्रक्रियेला ब्रेक! संगमनेरमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू

17/11/2026

बाळासाहेब ठाकरे: काळाच्या पडद्यावर उमटलेले वादळी व्यक्तिमत्त्व!

17/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.