Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार
राजकारण

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार असून राजकीय शिष्टाचार पाळलेच पाहिजेत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकारावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत बाळासाहेब थोरात यांनी संबंधितांवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र ते व्यक्त करताना सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार जपणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीमध्ये कोणत्याही पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात आणि त्यावर टीका करण्याचा किंवा असहमती व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, त्यासाठी संबंधित पुस्तक वाचून त्यातील विचार समजून घेत वैचारिक चर्चा करणे अपेक्षित असते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुस्तकाच्या प्रती फाडण्यासारखे कृत्य करणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, असे थोरात यांनी नमूद केले. या निषेध आंदोलनात आघाडीवर असलेले लोक सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आणि स्वार्थासाठी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. त्यांना स्वतःचा असा कोणताही ठोस राजकीय इतिहास किंवा भूगोल नसताना अशा लोकांनी सोनियाजींच्या त्यागावर आणि जीवनप्रवासावर भाष्य करणे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
सोनिया गांधी यांच्या राजकीय व वैयक्तिक जीवनप्रवासाचा संदर्भ देताना थोरात यांनी, सोनियाजींचा त्याग, त्यांचा खडतर संघर्ष आणि देशाप्रती असलेले अफाट समर्पण अत्यंत जवळून पाहिले असल्याचे सांगितले. त्यांच्या जीवनप्रवासातील अनुभव आणि विचार त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले असून, आक्षेप असल्यास पुस्तक वाचून त्यातील मुद्द्यांवर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुस्तक फाडण्याच्या प्रकारामुळे वाचकांची उत्सुकता अधिक वाढणार असून, सोनिया गांधी यांचा जीवनप्रवास जाणून घेण्यासाठी अधिकाधिक लोक हे पुस्तक वाचतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी त्यातून वैयक्तिक द्वेष किंवा असंस्कृत वर्तन व्यक्त होऊ नये, असे सांगत राजकारणात सुसंस्कृतपणा आणि राजकीय शिष्टाचार टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी शेवटी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 79
टीका पुस्तक बाळासाहेब थोरात बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026

बॅनरबाजी थांबवा, आधी विकासकामे दाखवा! आमदार अमोल खताळ यांनी आभासी विकासाच्या प्रतिमेतून बाहेर पडावे! माजी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद वर्पे यांचा आमदारांना सल्ला

17/11/2026

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा हुंकार जपण्याचा निर्धार; संगमनेरमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन!

17/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

By Annant Ppangarkar18/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ…

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026

बॅनरबाजीच्या वादावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; काँग्रेसच्या सत्ताकाळातील विकासाचा हिशोब द्या

18/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.