Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

19/11/2026

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

19/11/2026

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खोल दरीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2026No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी-साकूर दरा परिसरातील खोल दरीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मनिषा रामनाथ चाचण असे मृत महिलेचे नाव असून, ती बेपत्ता असल्याची नोंद घारगाव पोलिस ठाण्यात यापूर्वीच करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
मनिषा चाचण आपल्या कुटुंबीयांसह खंडेरायवाडी-साकूर दरा येथे वास्तव्यास होती. गुरुवारी सकाळी काही तरुण या परिसरात गेले असता त्यांना रक्ताचे डाग निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत याची माहिती घारगाव पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आला. घटनेचे वृत्त समजताच सुमारे शंभर ते दोनशे ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते.
महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खोल दरीत फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तपासासाठी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 86
गुन्हेगारी घातपात घारगाव पोलीस महिला मृतदेह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

संगमनेर तालुक्यात महसूल आणि गौण खनिज पथकाची कारवाई; प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

18/11/2026

न्यायालयाच्या आदेशाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील १८४ ग्रॅम सोने फिर्यादीच्या स्वाधीन

18/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडीत बेपत्ता महिलेचा मृतदेह खोल दरीत फेकल्याचा प्रकार उघड; घातपाताचा संशय

By Annant Ppangarkar19/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी-साकूर दरा परिसरातील खोल दरीत ४५ वर्षीय विवाहित महिलेचा…

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

19/11/2026

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.