Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

19/11/2026

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार
राजकारण

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

या कृत्याला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का, आणि नसेल तर त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करून बाळासाहेबांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज गुरुवारी संगमनेरमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि संजय निरुपम यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी आरोप केला की, राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन पाळला जात असताना शायना एनसी आणि संजय निरुपम यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला आहे. हेच यांचे बेगडी प्रेम आहे का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. या कृत्याला एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का, आणि नसेल तर त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करून बाळासाहेबांना न्याय द्यावा, अशी मागणी केली.
तालुका संघटक राजू सातपुते यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. तसेच, महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख वैशाली वडतले यांनी आक्रमक पवित्रा घेत शायना एनसी यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघात फिरू देणार नसल्याचा आणि त्या दिसल्यास फटके देण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात शहर प्रमुख अमित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा शहर प्रमुख बाळासाहेब घोडके, उपजिल्हा संघटक पप्पू कानकाटे, आश्वी तालुका प्रमुख प्रकाश गायकवाड, तालुका प्रमुख भीमाशंकर पावसे, विधानसभा संघटक दीपक साळुंखे, शहर संघटक असिफ तांबोळी, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख कैलास गायके, वाहतूक सेना तालुका प्रमुख अशोक बडे, महिला उपजिल्हा संघटक सपना देसाई, शहर संघटक वैशाली वडतले, उपशहर संघटिका काजल राठोड, शिवसेना संगमनेर खुर्द शाखाप्रमुख राजू सय्यद यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. संपूर्ण आंदोलनादरम्यान संबंधित नेत्यांच्या विरोधात जोरदार निषेध घोषणा देण्यात आल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 55
अमित चव्हाण आंदोलन जोडेमार राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026

मुंबईत दिसला आमदार अमोल खताळांचा साधेपणा; संगमनेरच्या भूमिपुत्राच्या टॅक्सीतून केला प्रवास!

18/11/2026

सोनिया गांधींच्या पुस्तकाच्या प्रती फाडल्यानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया… आत्मचरित्राच्या प्रती फाडणे हा प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रकार

18/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

गद्दारांच्या बेगडी प्रेमाचा बुरखा फाटला! संगमनेरमध्ये शिवसैनिकांचा संताप; शायना एनसी आणि निरुपम यांच्या प्रतिमेला जोडेमार

By Annant Ppangarkar19/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

सोनिया गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती फाडल्याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये राहुल गांधी समर्थक संघ आक्रमक; शहरात झळकवला निषेधाचा फलक!

19/11/2026

तपासात मदत करण्यासाठी ५० हजारांची लाच; परिविक्षाधीन पीएसआय लाचलुचपतच्या जाळ्यात, शिपाई पसार

19/11/2026

गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

19/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.