Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी
न्यायालय

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेला आरोपी विजय तबाजी काळे (वय ३९ वर्षे, रा. गणेशविहार, शिवनेरी बिल्डिंग, मालदाड रोड, घुलेवाडी, संगमनेर) हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश विश्वास मोरे याचा नात्याने मामा आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली असून प्राथमिक तपासात ६ कोटी ६५ लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विजय तबाजी काळे याला आता २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावण्यात आली आहे.
अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेने आरोपीच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. संगमनेर येथील विशेष तथा सत्र न्यायालयात यावर सुनावणी झाली असता, जिल्हा न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी आरोपीला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, संगमनेर येथील घुलेवाडी परिसरातील ‘अदमास डेब्ट कन्सल्टन्सी प्रा. लि.’ आणि ‘प्रथम वेल्थ मॅनेजमेंट’ या कंपन्यांच्या माध्यमातून आरोपींनी गुंतवणूकदारांना दरमहा १० टक्के इतका भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडत फिर्यादी योगेश रामदास जऱ्हाड यांच्यासह संगमनेर शहर आणि परिसरातील सुमारे ६० ते ६२ नागरिकांनी आपली कष्टाची कमाई या कंपन्यांमध्ये गुंतवली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मूळ रक्कम न देता एकूण ६ कोटी ६५ लाख ३९ हजार ८३७ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID) कलमांन्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी विजय तबाजी काळे (वय ३९ वर्षे, रा. गणेशविहार, शिवनेरी बिल्डिंग, मालदाड रोड, घुलेवाडी, संगमनेर) हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश विश्वास मोरे याचा नात्याने मामा आहे. आरोपी विजय काळे हा या कंपन्यांमध्ये एजंट म्हणून काम करत नागरिकांना शेअर मार्केटची माहिती देणे, त्यांचे फॉर्म भरून घेणे, नोटरी दस्त तयार करणे आणि लोकांकडून थेट रोख स्वरूपात रकमा स्वीकारण्याचे काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. २४ जून रोजी आरोपीला घारगाव परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करण्यासाठी ही पोलीस कोठडी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आरोपी विजय काळे याच्या बँक खात्यावर गुंतवणूकदारांच्या रकमेतील ३ लाख ५७ हजार २०० रुपयांची रक्कम जमा झाल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. या रकमेचा त्याने काय विनियोग केला, ठेवीदारांकडून गोळा केलेले पैसै कोणत्या बँक खात्यात किंवा डिमॅट खात्यात वळवले, तसेच गुंतवणूकदारांचे फॉर्म व इतर हस्तलिखित कागदपत्रे कोठे लपवून ठेवली आहेत, याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. याशिवाय, गुन्ह्यातील इतर फरार आरोपी सध्या कोठे आहेत आणि या पैशांमधून कोणतीही स्थावर किंवा जंगम मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे का, या सर्व बाबींचा कसून तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,015
अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी महेश मोरे विजय काळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.