Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भंडारदरा, मुळा आणि कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ तर पर्यटनावर बंदी
महाराष्ट्र संवाद विशेष

भंडारदरा, मुळा आणि कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ तर पर्यटनावर बंदी

निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर गेला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले असून भंडारदरा, मुळा आणि कुकडी समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पुनर्वसु नक्षत्राच्या सरींचे तांडव सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
भंडारदरा धरण आज (मंगळवारी) संध्याकाळपर्यंत निम्मे भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने धरणाचा साठा ३० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने भंडारदरा आणि मुळा पाणलोटातील सर्व प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.
निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर- भंडारदरा धरण क्षेत्रात रविवारी आणि सोमवारी झालेल्या तुफान पावसामुळे २४ तासांत विक्रमी १०३३ दलघफू नवीन पाणी दाखल झाले असून धरणाचा एकूण साठा ४५३२ दलघफू म्हणजेच ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. ११२ दलघफू क्षमतेचा वाकी तलाव सोमवारी ओव्हरफ्लो झाला असून त्याचे पाणी निळवंडे धरणात वेगाने जमा होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणाचा साठाही २० टक्क्यांवर गेला आहे. दुसरीकडे, हरिश्चंद्रगड आणि आंबित परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुळा नदीच्या विसर्गात मोठी वाढ होऊन कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.
मुळा धरणात ६४६९ दलघफू साठा झाला असून आज त्यात आणखी मोठी आवक अपेक्षित आहे. दक्षिण नगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी समूहातील धरणांमध्येही गेल्या ३४ तासांत १७३१ दलघफू नवीन पाणी आले असून, या समूहातील डिंभे धरणात सर्वाधिक ५१२ दलघफू पाण्याची आवक नोंदवण्यात आली आहे.
पावसाच्या या रौद्र रूपामुळे आदिवासी भागात झाडे उन्मळून पडली असून घरांचे आणि भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटीचा इशारा दिल्यामुळे गोदावरी नदीकाठच्या कोपरगाव आणि नेवासा येथील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मुसळधार पावसामुळे एकीकडे शेतकरी आणि पंढरपूरला जाणारे वारकरी सुखावले असले, तरी सुरक्षेच्या कारणास्तव कळसूबाई शिखर, सांदनदरी, रतनगड, कोकणकडा आणि इतर धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास वन आणि महसूल विभागाने सक्त मनाई केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 870
निळवंडे धरण पाऊस पाणी आवक भंडारदरा धरण मुळा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

महात्मा गांधी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब: संदीप वाकचौरे

07/10/2026

फक्त गतिरोधक नव्हे, अवजड वाहतूक आणि अतिक्रमणावरही ठोस कारवाई करा : इरफानभाई मन्सुरी

06/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.