Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन
महाराष्ट्र संवाद विशेष

अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन

प्रकरणी पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरामध्ये भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोठ्या प्रमाणावर चोरी (अपहार) झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर याचे पडसाद उमटत आहेत. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत संगमनेर येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, याप्रकरणी संगमनेरमध्ये ‘झिरो एफआयआर’ नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात २५ जून २०२६ रोजी या दान चोरीप्रकरणी एफआयआर क्रमांक ९०/२०२६ अन्वये आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या विशेष तपास पथकाद्वारे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र, हा गुन्हा केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून यामुळे संपूर्ण देशातील व महाराष्ट्रातील कोट्यवधी रामभक्तांच्या आणि हिंदू भाविकांच्या धार्मिक भावना अत्यंत दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदींचा आधार देत, दखलपात्र गुन्ह्यासाठी नागरिक देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करू शकतात, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ ‘झिरो एफआयआर’ नोंदवून घ्यावी आणि हा गुन्हा पुढील अधिकृत कायदेशीर तपासासाठी उत्तर प्रदेशातील संबंधित राम जन्मभूमी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात यावा, अशी आग्रही मागणी संगमनेरमधील नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर अरुण चव्हाण, राम अरगडे, ओंकार बिडवे, रामेश्वर पानसरे, अमोल शेलकर, डॉ. विजय पवार, ॲड. अनिल गोडसे, प्रकाश कडलग, ॲड. अमोल घुले यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या व इतर अनेक कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 399
निवेदन राममंदिर लूट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पुरस्कार

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने…

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.