Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून लवकरच संगमनेरकरांची सुटका; मालपाणी परिवाराच्या सहकार्याने अत्याधुनिक श्वान निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राचा शुभारंभ
सामाजिक

भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून लवकरच संगमनेरकरांची सुटका; मालपाणी परिवाराच्या सहकार्याने अत्याधुनिक श्वान निर्बिजीकरण व लसीकरण केंद्राचा शुभारंभ

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करून संगमनेर नगरपालिकेने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच शंभर टक्के मुक्तता होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केला.
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आणि मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारण्यात आलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचे उद्घाटन आमदार तांबे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विशेष केंद्राचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नगराध्यक्ष मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, आरोग्य समिती सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी आणि नगरसेविका रचना मालपाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार तांबे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करून संगमनेर नगरपालिकेने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. मालपाणी परिवाराने जागा आणि निधीची मोठी अडचण दूर केल्यामुळेच हे अद्ययावत केंद्र साकारणे शक्य झाले. आगामी ५ ते ६ महिन्यांत ‘युनिव्हर्सल’ कंपनीच्या माध्यमातून शहरातील सुमारे दोन हजार भटक्या कुत्र्यांवर टप्प्याटप्प्याने उपचार केले जातील. या प्रक्रियेमुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण तर येईलच, शिवाय त्यांच्यातील हिंस्रपणाही कमी होणार असल्याने ते नागरिकांसाठी धोकादायक ठरणार नाहीत.
तसेच मोकाट जनावरांच्या कायमस्वरूपी व्यवस्थेसाठी नगरपालिकेने वनविभागाकडे अडीच एकर जागेची मागणी केली असून, आगामी काळात तिथे कुत्र्यांसह डुक्कर, गाढव व गायींचीही सोय केली जाईल. प्राणीप्रेमींना प्राण्यांवर प्रेम करताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही केले.
प्रास्ताविक करताना मालपाणी फार्मच्या संचालिका नगरसेविका रचना मालपाणी यांनी सांगितले की, नगराध्यक्षा मैथिली तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनातून या केंद्राची संकल्पना आकारास आली. या कामात डॉ. शेळके व डॉ. स्वाती शेळके यांचे बहुमोल तांत्रिक मार्गदर्शन लाभले. या केंद्रामध्ये अत्याधुनिक वातानुकूलित ऑपरेशन थिएटर, श्वानांच्या आहारासाठी विशेष किचन आणि स्वच्छ पिंजऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या केंद्राची क्षमता पाच दिवसांत किमान ७० श्वानांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्याची आहे. यापुढील काळात संगमनेर नगरपालिकेच्या वतीने हे केंद्र चालवले जाणार असून आरोग्य सभापती किशोर टोकसे आणि पालिकेचे कर्मचारी येथे कार्यरत राहतील. उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांनी केंद्राची पाहणी करून मालपाणी परिवाराचे आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 621
अत्याधुनिक श्वान निर्बिजीकरण व लसीकरण केंद्र दुर्गाताई तांबे मैथिली तांबे रचना मालपाणी शुभारंभ सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
नैसर्गिक आपत्ती

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून…

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.