Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

24/08/2026

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

24/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुरूम वाहतुकीच्या वादातून संगमनेरच्या मालुंजे गावात गोळीबाराचा थरार; पोलीस तपास सुरू
गुन्हेगारी

मुरूम वाहतुकीच्या वादातून संगमनेरच्या मालुंजे गावात गोळीबाराचा थरार; पोलीस तपास सुरू

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, मात्र दुपारपर्यंत कोणालाही पकडण्यात यश आले नव्हते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन

संगमनेर:

अवैध मुरूम आणि माती वाहतुकीबाबत जाब विचारल्याच्या रागातून हा हल्ला झाला असून, यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात ही धक्कादायक घटना घडली.

समजलेल्या माहितीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक असलेले फिर्यादी संदीप घुगे (वय ४३) हे रात्री जेवण करून घराबाहेर शतपावली करत असताना, दोन मोटारसायकलवरून सहा जण तेथे आले. त्यातील एका गाडीवर विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर व सुदर्शन शिवाजी श्रीराम (दोघे रा. डिग्रस) हे होते. विशाल व प्रवीण यांनी घुगे यांना पाहताच पिस्तूल उपसून ‘तुझा कार्यक्रम आवरला’ असे म्हटले, तर सुदर्शन तलवार घेऊन त्यांच्या देशाने धावला.

प्रसंगावधान राखून घुगे यांनी घरात पळ काढत दरवाजा आतून बंद केला. हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले, यातील एक गोळी दरवाजा छेदून आत शिरली. त्यानंतर आरोपींनी तलवारीने दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. घुगे आणि त्यांचे कुटुंबीय घरात लपून बसल्याने मोठा अनर्थ टळला. ‘आज वाचलास, पण जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात विशाल खेमनर, प्रवीण पुणेकर, सुदर्शन श्रीराम आणि इतर तीन अनोळखी अशा एकूण ६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, मात्र दुपारपर्यंत कोणालाही पकडण्यात यश आले नव्हते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 436
गुन्हेगारी गोळीबार मालुंजे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

24/08/2026

अपहरण झालेल्या बालिकेची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका; दोन्ही आरोपींना अटक

22/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

निमोण येथे शिवसेनेच्या नूतन शाखेचे थाटात उद्घाटन; धांदरफळमध्ये आढावा बैठक ‘शिवसेना घराघरात, शिवसेना मनामनात’ पोहचवण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक सज्ज

By Annant Ppangarkar24/08/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा…

शिव्यांची नव्हे तर ओव्यांची संगत धरा; ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे प्रतिपादन

24/08/2026

पत्रकारावर हल्ला करून फरार झालेले तीन आरोपी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

24/08/2026

आज सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

24/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.