Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

25/08/2026

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक; महावितरणवर नागरिकांचा संतप्त मोर्चा
सामाजिक

लोडशेडिंग विरोधात संगमनेरात काँग्रेस आक्रमक; महावितरणवर नागरिकांचा संतप्त मोर्चा

महावितरणने यावर तातडीने मार्ग काढावा, अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयाविरोधात याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/07/2026Updated:04/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
माजी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून भारनियमनाच्या नावाखाली सातत्याने अनियमित आणि खंडित वीजपुरवठा केला जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून शहरासह ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी शुक्रवारी संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.
हे आंदोलन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा, वैष्णव मूर्तडक, गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ, आनंद वर्पे, शेखर सोसे, शितल उगलमुगले, उज्वला राहणे, ज्योती पवार, प्रीतम साबळे, डॉ. विजय पवार, सागर पावसे, दीपक शिंदे, अनिल घुगे, चंद्रकांत घुगे, निलेश सांगळे, भाऊसाहेब सांगळे, सागर सांगळे, जयप्रकाश मंडलिक, विशाल घुगे, नामदेव सोनवणे, रमेश काकड, आयान शेख, गौरव पेंडभाजे, दत्तात्रय गळंगे, आनंद वर्पे, तात्या कुटे आणि सोमनाथ जोंधळे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
हिंस्र प्राण्यांची भीती अन् शेतकरी हैराण
आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सध्या दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या लवकर अंधार पडतो, त्यातच ही वेळ विद्यार्थ्यांची शाळेतून घरी परतण्याची असते. अंधारामुळे रस्त्यांवर हिंस्र प्राण्यांचा वावर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येत आहेत. दुसरीकडे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यामध्ये गाई-म्हशींचे दूध काढणे आणि स्वच्छतेची कामे अंधारातच करावी लागत आहेत. या अघोषित लोडशेडिंगमुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर व्यापारी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने संध्याकाळच्या वेळी वीज खंडित करू नये आणि या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
खंडित होणारा वीज पुरवठा ही चिंतेची बाब: डॉ. जयश्रीताई थोरात
मागील अनेक दिवसांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने आणि अनियमित सुरू असून महावितरण या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस किंवा समाधानकारक कारणे दिली जात नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. महावितरणने यावर तातडीने मार्ग काढावा, अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालयाविरोधात याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी दिला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 262
जयश्री थोरात निवेदन भारनियमन महावितरण मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026

संगमनेर तालुक्यात मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान सुरू; अभिनेत्री इशिता शर्मा व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा स्तुत्य पुढाकार

18/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांची गुटख्याविरोधात मोठी कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar25/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील खर्डा पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य…

संगमनेरमध्ये सह्याद्री कॉलेज शेजारील ‘बर्गेज कॅफे’वर पोलिसांची धाड; अश्लील चाळ्यांसाठी जागा पुरवणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

25/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

आज मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.