Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!
आंदोलन

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

हा प्रश्न अत्यंत गंभीर असून केवळ नेत्यांनी बोलून सुटणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलल्याच्या निषेधार्थ संगमनेरकरांनी आता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेकांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनाखाली पुणे, चाकण, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर ते नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून भूसंपादन प्रक्रियाही मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यात आली होती, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी ७०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमही वाटप झाली होती.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनेक बैठका घेऊन सुपीक जमीन, वनक्षेत्र आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा मार्ग निश्चित केला होता, मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २०२४ नंतर हा मार्ग बदलण्यात आल्याचा गंभीर आरोप डॉ. थोरात यांनी केला आहे.
सध्याचे पालकमंत्री याविषयी वेगवेगळे दावे करत असून कधी रेल्वे शिर्डीमार्गे तर कधी देवठाणमार्गे प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. परंतु, मूळ मंजूर मार्ग रद्द करून संगमनेरच्या वाट्याला आलेली रेल्वे शेजारच्या तालुक्याकडे वळविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संगमनेर हा सहकार, शिक्षण आणि व्यापाराच्या क्षेत्रात राज्यातील एक आदर्श तालुका असून, येथील २५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण आणि रोजगारासाठी पुण्यात आहेत. रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली असती तर पुणे-संगमनेर हे अंतर अवघ्या दोन तासांत पार करता आले असते, मात्र आता नागरिकांना पाच ते सहा तासांचा बसप्रवास करावा लागतो आणि अनेक युवक जीव धोक्यात घालून दुचाकीने प्रवास करतात, ज्यातून अनेक अपघात घडले आहेत.
हा प्रश्न अत्यंत गंभीर असून केवळ नेत्यांनी बोलून सुटणारा नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र होऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष केला पाहिजे, असे सांगत त्यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. युवक काँग्रेसच्या वतीने यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, हक्काची रेल्वे मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. चळवळीतून घडलेला हा तालुका असून संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. हक्काची रेल्वे मिळविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 496
आंदोलन आवाहन जयश्री थोरात नाशिक पुणे रेल्वे मार्ग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.