Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

प्रतिकात्मक पुतळ्यास साडी नेसवून पुतळा पेटवून दिला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/06/2026Updated:19/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
शिवसेना ठाकरे गटाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पक्षाशी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. याचा निषेध नोंदविणाऱ्या ठाकरेंच्या शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे इतर आंदोलकांना सवलत आणि काहींवर गुन्हा, या प्रकाराबद्दल शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संगमनेर येथील बसस्थानकासमोरील जुना पुणे-नाशिक महामार्गावर उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर रस्ता रोको, आंदोलन केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या विधानांचा आणि प्रतिमेचे विटंबन केल्याचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी ७ निष्पन्न आरोपींसह इतर ५ ते १० आंदोलकांचा गुन्हा दाखल झालेल्या मध्ये समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१७ जून) दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकासमोरील जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलकांनी एकत्र येत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास साडी नेसवून पुतळा पेटवून दिला. तसेच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि सार्वजनिक शांतता भंग पावली. घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला सारून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या बेकायदेशीर कृत्याबद्दल पोलीस हवालदार संजय बढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २२३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी, शहर प्रमुख अमित रामकिसन चव्हाण व फैसल सय्यद, भीमाशंकर पावसे, अमोल डुकरे, आसिफ तांबोळी आणि त्रिलोक कन्हैयालाल कतारी यांच्यासह अन्य आंदोलकांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल दहातोंडे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,160
अमर कतारी अमित चव्हाण आंदोलन गुन्हे शिवसेना उद्धव ठाकरे संगमनेर शहर पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

संगमनेरमधील वादग्रस्त ड्रग प्रकरण अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे; मात्र निर्दोषाला गोवणाऱ्या खाकी वर्दीतील ‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई कधी?

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

By Annant Ppangarkar19/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पारदर्शक कामकाज आणि गुणवत्तेच्या जोरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी…

बेकायदेशीर गॅस रिफिलींगच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; २१.८० लाखांच्या मुद्देमालासह १३३ टाक्या जप्त

19/09/2026

सुफियाना सुरावटींनी संगमनेरकर रसिक मंत्रमुग्ध; ‘सजदा’ सोहळ्याने संगमनेर फेस्टिव्हलची रंगली तिसरी संध्याकाळ

19/09/2026

आज शनिवार 19 सप्टेंबर, जाणून घ्या आजचे सर्व राशीचे राशिभविष्य

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.