Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक

05/11/2026

‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य

05/11/2026

राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण

05/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक
राजकारण

संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक

आता आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित यंत्रणा काय पावले उचलते आणि दोषी ठेकेदारावर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण खांबा गावाचे आणि परिसराचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खांबा गावासाठी वरदान ठरणारी ‘कामधेनू उपसा जलसिंचन योजना’ सध्या निकृष्ट काम आणि भोंगळ कारभारामुळे चहूबाजूने चर्चेत आली आहे. मुळा धरणावरून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याच्या या १६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ठेकेदाराने केलेल्या मनमानी कारभाराची आणि निकृष्ट कामाची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी थेट जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून दर्जा तपासण्याचे सक्त आदेश दिले आहेत. 

या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि संबंधित ठेकेदारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सन २०२४ मध्ये मंजूर झालेली ही १६ कोटी खर्चाची योजना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रखडलेली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होता. त्यातच, जलसंधारण विभागाला कोणतीही पूर्वकल्पना न देता ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे पाइपलाइनचे काम परस्पर जमिनीत बुजवून टाकल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला.

या संदर्भातील तक्रारी घेऊन ग्रामस्थांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी मांडलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्ष कामातील त्रुटी पाहून आमदार खताळ संतप्त झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी घटनास्थळी उपस्थित जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, कनिष्ठ अभियंता सनी पगार आणि शाखा अभियंता शुभम गाडेकर यांना धारेवर धरले.

केवळ वरवरची पाहणी करून चालणार नाही, तर कामाची सत्य परिस्थिती जनतेसमोर आली पाहिजे, असे सांगत ठेकेदाराने जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून काढत तिच्या गुणवत्तेची कठोर तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. जनतेच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या या योजनेत गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा त्यांनी या वेळी दिला.

या निकृष्ट कामात हलगर्जीपणा किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीविरोधात तात्काळ रीतसर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या कामासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जप्त करण्याबाबतही आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

आता आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित यंत्रणा काय पावले उचलते आणि दोषी ठेकेदारावर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण खांबा गावाचे आणि परिसराचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 45
अमोल खताळ खांबे पाणी योजना निकृष्ट काम
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026

आदर्श स्वच्छ व सुंदर संगमनेरची संकल्पना पूर्णत्वाकडे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात; विरोधकांवरही जोरदार निशाणा!, ५ कोटींच्या नवीन स्वच्छता वाहनांचे दिमाखात लोकार्पण

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात निकृष्ट कामाचा पर्दाफाश! १६ कोटींच्या योजनेची गाडलेली पाइपलाइन उकरून दर्जा तपासणार; आमदार अमोल खताळ आक्रमक

By Annant Ppangarkar05/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खांबा गावासाठी वरदान ठरणारी ‘कामधेनू उपसा जलसिंचन योजना’…

‘एस. आर. थोरात मिल्क प्रॉडक्ट्स’कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल इतक्या कोटींचे वाटप; विविध उपक्रमांद्वारे शेतकरी हिताला प्राधान्य

05/11/2026

राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण

05/11/2026

आमदार अमोल खताळांच्या जिल्हा परिषदेच्या शाळा भेटीमध्ये समोर आले हे गंभीर वास्तव! नेमकं काय घडलं…

05/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.