Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन
राजकारण

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि संगमनेरच्या विकासाचे नवे पर्व सुरू करावे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर (विशेष प्रतिनिधी):
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात गेल्या ३५ दिवसांत निर्माण झालेले समन्वयाचे आणि सहमतीचे वातावरण केवळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरते किंवा राजकीय समीकरणांपुरते मर्यादित न राहता, त्याचा प्रत्यक्ष फायदा संगमनेर तालुक्याला मिळावा, अशी रोखठोक अपेक्षा संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्याच्या पातळीवर निर्माण झालेली ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेर तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांच्या रुळावर धावणे गरजेचे असून, राजकीय सहमतीचा खरा सन्मान सामान्य जनतेच्या समस्या सुटल्यानंतरच होईल, असा सूर त्यांनी आळवला आहे.
जिल्ह्यातील सहकार आणि राजकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी समोर आलेला सहकार्याचा हात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत योग्य मान-सन्मान राखत स्वीकारला होता. राजकारणात कटुता बाजूला ठेवून संवाद आणि परस्पर सन्मानाची भूमिका घेणे नेहमीच स्वागतार्ह ठरते. मागील महिनाभरात जिल्ह्याच्या विविध महत्त्वाच्या विषयांवर वरिष्ठ नेत्यांमध्ये अनेक बैठका आणि सकारात्मक चर्चा झाल्या. मात्र, या सहकार्याकडे केवळ राजकीय लाभ किंवा निवडणुकीचे गणित म्हणून न पाहता, या सकारात्मक वातावरणाचा उपयोग संगमनेर तालुक्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी केला गेला पाहिजे, असा आग्रह शेलकर यांनी धरला आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक, सामाजिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांशी निगडित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित आहेत. यामध्ये शहराच्या ऐतिहासिक अस्मितेशी जोडलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न असो वा सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेला एसटीपी प्लांट असो, हे विषय तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. याशिवाय संगमनेर शहरातून जाणाऱ्या कोल्हार-घोटी महामार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न मांडताना अमोल शेलकर यांनी पाणी आणि विजेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. निळवंडे आणि भोजापूर कालव्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे आवश्यक आहे. तसेच साकुर पठार भागातील तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मुळा धरणावरील मोरदरा धरणाचा प्रश्न तातडीने सुटला पाहिजे.
नदीलगतच्या बळीराजाला पिकांच्या संगोपनासाठी किमान ११ तास सातत्यपूर्ण वीजपुरवठा मिळण्याची गरज आहे. यासोबतच सोयाबीन पिकाच्या नुकसानभरपाईत संगमनेरच्या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तालुक्याच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच जावी यासाठी सर्वपक्षीय एकजूट दाखवून केंद्र व राज्य सरकारकडे सक्षम पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासकीय सोयीसाठी संगमनेर आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहाता तालुक्याचा समावेश करणे आणि आश्वी अपर तहसीलचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेऊन योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. हे सर्व प्रश्न कोणत्याही एका पक्षाचे किंवा नेत्याचे नसून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यावसायिक आणि भावी पिढीच्या हिताचे आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी आणि कामधेनू संस्था आहे. तिचे प्रशासकीय व आर्थिक बळ जिल्ह्याच्या प्रगतीसाठी वापरले जाण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, त्याच वेळी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची चक्रे गतीने फिरणे तितकेच महत्त्वाचे आहे. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा पातळीवर संवादाची जी सकारात्मक भूमिका घेतली, त्याच भूमिकेचा विस्तार आता तालुक्यात दिसला पाहिजे. त्यासाठी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे आणि संगमनेरच्या विकासाचे नवे पर्व सुरू करावे, अशी अपेक्षा अमोल शेलकर यांनी व्यक्त केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 101
अमोल शेलकर बाळासाहेब थोरात राजकारण राधाकृष्ण विखे सत्यजित तांबे सहमती एक्स्प्रेस सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

By Annant Ppangarkar04/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराला स्वच्छतेतून समृद्धीकडे नेण्यासाठी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी ४ वाजता…

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.