Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ
राजकारण

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

पिंपळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुका म्हणजे काही जणांची जहागीरदारीच झाली होती. जमिनीचा सातबारा उतारा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या नावावर असला, तरी प्रत्यक्ष मालकी दुसऱ्यांची असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तालुक्यातील जनतेने परिवर्तन घडवून आणत मला काम करण्याची संधी दिली आहे, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.
पिंपळे येथे शिवसेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महायुतीचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळेच मी आमदार झालो आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडविणे हेच माझे कर्तव्य आहे. माझ्याकडे कोणती पदवी आहे यापेक्षा मी जनतेसाठी काय करतो हे महत्त्वाचे आहे. मला माझ्या कुटुंबातील कोणालाही ठेकेदार बनवायचे नाही किंवा मुलाला राजकारणात आणायचे नाही. सर्वसामान्य जनतेने दिलेले प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे.
घरकुल योजनांसाठी जागेअभावी अडचणी येत असतील, तर आगामी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा करेन. सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
निमोण आणि तळेगाव हा भाग कायम दुष्काळी म्हणून हिणवून काहींनी दोन-तीन पिढ्यांचे नुकसान केले. मात्र, या संधीचे सोने करून संगमनेरचा चेहरामोहरा बदलण्याचा माझा संकल्प आहे. भोजापूरच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावून हा दुष्काळी भाग सुजलाम् सुफलाम् केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनानुसार आमदार खताळ यांनी सत्काराऐवजी गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार पिंपळे शिवसेना शाखेच्या वतीने गरीब कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप करण्यात आला. तसेच अपघातात आई-वडील गमावलेल्या युवराज व पूनम माळी यांना नवीन कपडे आणि ताराबाई माळी यांना साडी प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंकुश चकोर यांनी केले, सूत्रसंचालन प्रशांत कर्पे यांनी केले तर खंडू वाघ यांनी आभार मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 170
अमोल खताळ राजकारण शिवसेना शाखा उद्घाटन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास लोकप्रतिनिधींची बदनामी होते; दर्जेदार कामासाठी आमदार खताळ यांची ठेकेदाराला तंबी

31/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

By Annant Ppangarkar01/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या…

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

संगमनेरात दिवाळीच्या तोंडावर उफाळला वाद! एका नगरसेवकामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक; वसुली आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर खळबळजनक आरोप! गोरगरिबांना त्रास देणारा तो नगरसेवक कोण?

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.