महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
राहाता तालुक्यातील पिंपळस येथे राहाता तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली. राजकारणातील सततची धावपळ आणि विकासकामांचा मोठा व्याप बाजूला सारत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी थेट मैदानात उतरत फलंदाजी केली. त्यांच्या या दिलखुलास आणि उत्साही सहभागामुळे उपस्थितांमध्ये मोठा जोश पाहायला मिळाला. राजकीय जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही मनातला खेळाडू जिवंत ठेवणाऱ्या या क्षणाने उपस्थितांची मने जिंकली.