Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित माधव महाजन यांनी फिर्याद दिली
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांतील लोकांमध्ये आपसांत हाणामारी व झुंज झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही गटांतील एकूण बेचाळीस जणांवविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दिनांक १ नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जोर्वे गावातील मुख्य चौकात ही घटना घडली. पोलीस प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या सूचनांना व आदेशांना न जुमानता आरोपींनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवला. जोर्वे गावातील मुख्य चौकात लोखंडी पोल लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन्ही गट आपसांत भिडले आणि त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार झुंज दिली. विशेष म्हणजे, जिल्हादंडाधिकारी अहिल्यानगर यांनी जिल्ह्याच्या स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस कायदा कलमांन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. या आदेशाचे व कायदेशीर नियमांचे उघडपणे उल्लंघन करून सार्वजनिक शांतता भंग करण्यात आली.
या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमित माधव महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात सहभागी असलेल्या पहिल्या गटातील आरोपींमध्ये इंद्रजित पंडीत थोरात, सुरेश जगन्नाथ थोरात, शरद नारायण थोरात, संजय निवृत्ती थोरात, राजेंद्र श्रीपत थोरात, वसंत मुरलीधर बोरकर, अक्षय गणपत दिघे, रमेश बाळासाहेब दिघे, मुकेश विठ्ठल काकड, सत्यजीत प्रकाश थोरात, हर्षल निवृत्ती काकड, विठ्ठल नानासाहेब काकड, भाऊसाहेब बाबुराव दिघे, अभिषेक शरद थोरात, बादशहा रामकृष्ण बोरकर, अमित भास्कर थोरात, पुंजा यादव दिघे, कैलास पुंडलिक इंगळे, किसन हिरामन खैरे, दिगंबर नामदेव इंगळे, राहुल रवींद्र बोरकर आणि अनिल बाळासाहेब दिघे (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
तसेच दुसऱ्या गटातील गोकुळ गणपत दिघे, नितीन सखाराम दिघे, विशाल भास्कर थोरात, वसंत उर्फ सचिन रामभाऊ दिघे, शरद गणपत दिघे, बाळासाहेब विठोबा जोर्वेकर, अनिकेत भारत जोर्वेकर, मयूर नामदेव गाडेकर, बाबासाहेब शिवाजी थोरात, रवींद्र नामदेव गाडेकर, बाळासाहेब कारभारी दिघे, दिलीप विठ्ठल काकड, प्रकाश वसंत काकड, गणेश बंडोपंत काकड, नंदू कारभारी थोरात, बाळासाहेब राधू इंगळे, मच्छिंद्र आंबादास पिंपळे, जितेंद्र कैलास दिघे, नवनाथ उर्फ भावड्या गंगाधर बलसाणे आणि पंढरीनाथ दादाभाऊ बलसाणे (सर्व रा. जोर्वे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या नावांचा समावेश आहे.
रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 566
हाणामारी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026

संगमनेरात ५ लाखांच्या मुक्या जनावरांचा जीव वाचला; गोहत्या करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

29/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar02/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात पूर्वकल्पना व प्रशासकीय सूचना झुगारून लोखंडी पोल…

सोमवार ०२ नोव्हेंबर —- आजच्या दिवसाचे राशिभविष्य

02/11/2026

जेव्हा पालकमंत्र्यांच्या हातात क्रिकेटची बॅट येते तेव्हा….

01/11/2026

संगमनेर तालुका कोणाची जहागीरदारी नाही; जनतेने परिवर्तन घडविले: आमदार अमोल खताळ

01/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.