Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले
आंदोलन

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

सध्या विकासाच्या नावाखाली आणि मतदार संघातील निधीचा शस्त्रासारखा वापर करून ही पक्षांतरे घडवून आणली जात आहेत
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई:

राज्यातील महाविकास आघाडीच्या सहा खासदारांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश करून जनतेचा आणि महाविकास आघाडीचा घोर विश्वासघात केला आहे. या राजकीय पक्षांतराच्या आणि संधीसाधूपणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) राज्यभरात तीव्र निदर्शने करणार असल्याची घोषणा पक्षाचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. माकपच्या सर्व शाखा जनतेला सोबत घेऊन राज्यभर निदर्शने करतील आणि गद्दारांचे पुतळे जाळून या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करतील.
या सहाही खासदारांना लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर माकप आणि डाव्या जनसंघटनांनी निवडणुकीत पाठिंबा दिला होता. कार्यकर्त्यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात जीवाची बाजी लावून या खासदारांना निवडून आणले होते. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, आमदारांचे पक्षांतर तसेच कांदा व दुधाचे कोसळलेले भाव यांमुळे जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र असंतोष होता. शेतकऱ्यांचा हाच संताप किसान सभेच्या आंदोलनातून व्यक्त झाला होता, ज्यामुळे जनतेने भाजपला नाकारत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केले. मात्र, निवडून आल्यानंतर हेच खासदार पुन्हा भाजपला पाठिंबा देण्यासाठी शिंदे सेनेत सामील झाले आहेत, हा डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी केलेला मोठा द्रोह आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज डॉ. नवले यांनी व्यक्त केली आहे. डावे पक्ष कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे संघर्ष करतात, मात्र निवडणुकीत तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून केवळ पैसा आणि यंत्रणा उभी करण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाते. नैतिक मूल्ये नसलेल्या आणि केवळ अवैध पैसा असलेल्या अशा लोकांना उमेदवारी दिल्यास काय परिणाम होतो, याचा पुनर्विचार महाविकास आघाडीने करणे आवश्यक आहे.
सध्या विकासाच्या नावाखाली आणि मतदार संघातील निधीचा शस्त्रासारखा वापर करून ही पक्षांतरे घडवून आणली जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून केवळ आपल्याच लोकांना निधी देऊन विकासाचा आभास निर्माण केला जातो, परंतु प्रत्यक्षात यातून मोठे कमिशन, टक्केवारी आणि घोटाळे करून स्वतःची संपत्ती वाढवली जाते. टक्केवारीच्या या राजकारणात सहभागी होण्यासाठीच विरोधी पक्षांचे लोक सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळतात, ज्यामुळे विचारांचे राजकारण संपुष्टात येत असून लोकशाही आणि निवडणुकांवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे.
आमदार आणि खासदारांच्या या गद्दारीच्या प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी देशात निवडणूक आयोग व सरकारी यंत्रणांचा गैरवापर रोखणे आणि अमुलाग्र निवडणूक सुधारणा लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व प्रकारच्या राजकीय संधीसाधूपणाच्या विरोधात माकप व्यापक जनजागृती मोहीम राबवणार असून, पक्षाच्या सर्व शाखा, जन व वर्गीय संघटनांच्या सदस्यांनी आणि जनतेने या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 637
अजित नवले आंदोलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सण-उत्सवांमध्ये वाढणारा डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि लेझर लाईट्सचा अतिवापर मानवी आरोग्यासाठी…

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

मंगळवार, १३ ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमची रास आज काय सांगते

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.