Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरालगतच्या गावात एजंटराजचा सुळसुळाट; गुंजाळवाडी ग्रामसभेत बेकायदेशीर प्लॉटिंगचा पाढा वाचणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांना धमक्या व खोट्या आरोपांचा करावा लागतोय सामना

29/11/2026

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

29/11/2026

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश
राजकारण

शाळा परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकवर बंदी; आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश, राज्यात शाळांच्या ५०० मीटर परिसरात उच्च कॅफिनयुक्त ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश

तांबे यांनी हा मुद्दा केवळ एका चर्चेपुरता मर्यादित न ठेवता अनेक वेळा सभागृहात उपस्थित करत धोरणात्मक निर्णयाची मागणी लावून धरली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विशेष प्रतिनिधी | मुंबई:
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर ठरू शकणाऱ्या ‘स्टिंग’सारख्या उच्च कॅफिनयुक्त ऊर्जा पेयांच्या विक्रीवर शाळांच्या ५०० मीटर परिसरात बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यात घेण्यात आला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात येण्यासाठी विधानपरिषदेत ठाम भूमिका घेत आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या संपूर्ण मुद्द्यावर बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी वारंवार विधानपरिषदेत स्पष्टपणे मांडले की शाळा परिसरात अशा प्रकारच्या ‘हाय कॅफिन’ आणि आकर्षक पॅकेजिंग असलेल्या पेयांची सहज उपलब्धता ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. “शालेय वयातील मुलांमध्ये अशा पेयांचे वाढते सेवन चिंताजनक असून, यावर तातडीने निर्बंध आवश्यक आहेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात घेतली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले गेले.
तांबे यांनी हा मुद्दा केवळ एका चर्चेपुरता मर्यादित न ठेवता अनेक वेळा सभागृहात उपस्थित करत धोरणात्मक निर्णयाची मागणी लावून धरली. शाळांच्या परिसरात आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणीही त्यांनी सातत्याने केली होती.
अखेर या मागण्यांना यश मिळत शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’सारख्या ऊर्जा पेयांच्या विक्रीवर बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या संदर्भात मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित निर्देश दिल्याची माहिती आहे. या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या पेयांवर केवळ शाळा परिसरापुरती मर्यादा न ठेवता राज्यस्तरावर कठोर आणि सर्वसमावेशक धोरण आखण्यात यावे, अशीही मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी अधोरेखित केली आहे.
आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याची नोंद –
📌 दि. १२ जुलै २०२४ रोजी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला.
📌 दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या तत्कालीन मंत्री महोदयांना पत्र लिहून शाळांच्या परिसरातील कॅफेनयुक्त पदार्थांच्या विक्रीबाबत बैठक आयोजित करण्याची मागणी केली.
📌 दि. २३ जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध विभागाचे मा. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
📌 दि. २९ जानेवारी २०२५ रोजी अन्न व औषध विभागाचे मा. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, या बैठकीत एनर्जी ड्रिंक्सवरील संभाव्य धोरण, जनजागृती अभियान आणि निर्बंध लागू करण्याच्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा झाली.
📌 दि. १ जुलै २०२५ रोजी पावसाळी अधिवेशनात स्टिंगसारख्या घातक एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्यात यावी, यासाठी पुन्हा एकदा आवाज उठवण्यात आला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,000
अधिवेशन बंदी सत्यजित तांबे स्टिंग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरालगतच्या गावात एजंटराजचा सुळसुळाट; गुंजाळवाडी ग्रामसभेत बेकायदेशीर प्लॉटिंगचा पाढा वाचणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांना धमक्या व खोट्या आरोपांचा करावा लागतोय सामना

29/11/2026

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

29/11/2026

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर शहरालगतच्या गावात एजंटराजचा सुळसुळाट; गुंजाळवाडी ग्रामसभेत बेकायदेशीर प्लॉटिंगचा पाढा वाचणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ यांना धमक्या व खोट्या आरोपांचा करावा लागतोय सामना

By Annant Ppangarkar29/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी गावांमध्ये बायपासच्या वरती काही डेव्हलपर ग्रुपकडून सुरू असलेल्या…

संगमनेरच्या कामगारांसाठी ESIS दवाखाना सुरू; ४० कोटींच्या निधीसह १०० खाटांच्या रुग्णालयाच्या मागणीला आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

29/11/2026

नाट्यगृहाचा वाद | लोकप्रतिनिधींचा अपमान आणि शासनाच्या परिपत्रकाची पायमल्ली; संगमनेरच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची माजी नगरसेवकांची आक्रमक मागणी! थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन

29/11/2026

रविवार विशेष | सुप्रिया सुळेंना अजून हवं तरी काय?

29/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.