Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘मंथ ऑफ काइंडनेस’ उपक्रमातून संगमनेर तालुका घडवणार आनंदी समाज; डॉ. जयश्रीताई थोरात यांचे दररोज एक चांगली कृती करण्याचे आवाहन
सामाजिक

‘मंथ ऑफ काइंडनेस’ उपक्रमातून संगमनेर तालुका घडवणार आनंदी समाज; डॉ. जयश्रीताई थोरात यांचे दररोज एक चांगली कृती करण्याचे आवाहन

कृतज्ञता आणि दयाळूपणाच्या एका कृतीतून माणसांची साखळी तयार होईल, जी समाज आणि देशाच्या हॅपिनेस इंडेक्समध्ये भर घालेल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
सध्या समाजात वाढलेली नकारात्मकता दूर करून मानवता आणि आनंदाची निर्मिती करण्यासाठी संपूर्ण जुलै महिना ‘मंथ ऑफ काइंडनेस’ (दयाळूपणाचा महिना) म्हणून राबवण्याचा एक अनोखा संकल्प प्रसिद्ध कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सोडला आहे. या मोहिमेत प्रत्येकाने दररोज किमान एक चांगली कृती करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. जगभरात अशा प्रकारची संकल्पना पहिल्यांदाच संगमनेर तालुक्यात राबवली जात असून, या संदर्भात यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, जागतिक युद्ध, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि नकारात्मक बातम्यांमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे, ज्याचा विपरीत परिणाम पुढील पिढीवर होत आहे. हे वातावरण बदलण्यासाठी आणि समाजात आनंद निर्माण करण्यासाठी जुलै महिन्यात सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
मोठ्यांना मदत करणे, पशु-पक्ष्यांची काळजी घेणे, पर्यावरण जोपासणे, आजी-आजोबांशी गप्पा मारणे, आई-वडिलांना कामात मदत करणे, ज्येष्ठांना सन्मान देणे आणि आपल्या शाळा, महाविद्यालय किंवा कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे यासारख्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद निर्माण करता येतो. समाजाच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही देखील या मोहिमेचा एक भाग आहे.
ही संपूर्ण संकल्पना विनापैशाची आणि विनाकष्टाची असून यासाठी केवळ चांगल्या इच्छेची गरज आहे. कृतज्ञता आणि दयाळूपणाच्या एका कृतीतून माणसांची साखळी तयार होईल, जी समाज आणि देशाच्या हॅपिनेस इंडेक्समध्ये भर घालेल. जुलै महिन्यातील शांत पाऊस आणि निसर्गाच्या हिरवाईप्रमाणेच समाजातही मानवतेची हिरवाई निर्माण करण्यासाठी ही चळवळ महत्त्वाची ठरेल. या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणाऱ्या विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना महिन्याच्या शेवटी ‘काइंडनेस चॅम्पियन’ म्हणून गौरविण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या आनंदाच्या चळवळीमध्ये आजची तरुण पिढी अर्थात ‘झेड जनरेशन’ मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या संकल्पनेचा प्रसार करावा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवून या अभूतपूर्व मोहिमेत सामील व्हावे, असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी शेवटी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 374
जयश्री थोरात मंथ ऑफ काइंडनेस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.