Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » २२ लाखांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त; ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’चा परवाना निलंबित, मालकावर गुन्हा दाखल
शेती व सहकार

२२ लाखांचा बेकायदेशीर खतसाठा जप्त; ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’चा परवाना निलंबित, मालकावर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि निकृष्ट व बेकायदेशीर खते विकणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाची ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/06/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर:
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील ‘कृषी गौरव फर्टिलायझर्स’वर कृषी विभागाने मोठी कारवाई करत २१ लाख ८० हजार ४८६ रुपये किमतीचा २ हजार ३४ गोण्यांचा बेकायदेशीर आणि निकृष्ट खतसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी आस्थापनेचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित दुकानाचा खत विक्री परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी विभागाच्या पथकाने १५ जून २०२६ रोजी शिंगवे तुकाई येथील एमआयडीसी मधील प्लॉट क्र. बी-५६ वर असलेल्या या आस्थापनेची अचानक तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान खत विक्री आणि साठवणुकीशी संबंधित कोणतीही आवश्यक कागदपत्रे अथवा नोंदवह्या पथकाला मिळून आल्या नाहीत. तसेच विविध कंपन्यांच्या नावांचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या उत्पादित केलेल्या रासायनिक खतांच्या तब्बल २ हजार ३४ गोण्या साठवून ठेवल्याचे समोर आले, जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या खतांचे नमुने तातडीने पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. नियमानुसार या अहवालासाठी ३० दिवसांचा अवधी असताना, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कृषी विभागाने अवघ्या १० दिवसांत हा अहवाल प्राप्त केला.
या प्रयोगशाळा अहवालात संबंधित खतांमधील पीएच, सेंद्रिय कर्ब आणि कार्बन-नायट्रोजनचे (सी/एन) गुणोत्तर विहित मानकांनुसार अत्यंत अयोग्य आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि निकृष्ट व बेकायदेशीर खते विकणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाची ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील आणि अशा प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 644
कारवाई कृषी गौरव फर्टीलायझर्स कृषी विभाग निकृष्ट खते बेकायदेशीर खत साठा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- यावर्षीचा दुष्काळ हा कोरोना संकटाप्रमाणे असून कठीण दुष्काळी संकटातून मार्ग काढत…

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.