Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

31/10/2026

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

31/10/2026

आज शनिवार ३१ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

31/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती
महाराष्ट्र संवाद विशेष

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

'गुंगी गुडीया' ते 'आयर्न लेडी'... जागतिक पातळीवर ठसा उमटवणाऱ्या इंदिराजींचे योगदान अतुलनीय- दुर्गाताई तांबे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
देशात ‘गरीबी हटाव’चा नारा देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा बदलणाऱ्या स्व. इंदिरा गांधी यांचे कणखर आणि खंबीर नेतृत्व भारताला लाभले. बांगलादेशची निर्मिती आणि बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारखे ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेणाऱ्या इंदिराजींनी देशाची अखंडता आणि एकात्मता टिकवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, असे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘शक्तीस्थळ’ येथे अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांच्या ४२ व्या स्मृतिदिनानिमित्त आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना बाळासाहेब थोरात बोलत होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना थोरात म्हणाले की, स्व. इंदिरा गांधी यांनी देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून काम करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५०० हून अधिक संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून अखंड भारताची उभारणी केली. या दोन्ही थोर राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करून देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना इंदिराजींच्या खंबीर नेतृत्वाबद्दल नितांत आदर होता. पुढील पिढीला त्यांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळावी यासाठीच नवी दिल्लीच्या धर्तीवर अमृत उद्योग समूहामध्ये ‘शक्तीस्थळ’ची उभारणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात विरोधकांनी त्यांना ‘गुंगी गुडीया’ म्हणून हिणवले असले, तरी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने त्यांनी जागतिक पटलावर भारताचा नवा ठसा उमटवला.
या अभिवादन प्रसंगी स्व. इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, रामहरी कातोरे, ॲड. नानासाहेब शिंदे यांच्यासह सहकारातील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 81
दुर्गाताई तांबे बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीविरोधात संगमनेरमध्ये एल्गार! पर्यावरणाचा विनाश थांबवा! संगमनेरातील पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

26/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

By Annant Ppangarkar31/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशात ‘गरीबी हटाव’चा नारा देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा नकाशा…

बँकेच्या सायरनचा अलर्ट; मध्यरात्री पोलिसांना करावी लागली धावपळ

31/10/2026

आज शनिवार ३१ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

31/10/2026

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

30/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.