Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

30/10/2026

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून ३०० आदिवासी चिमुकल्यांना मायेची ऊब; एकविरा फाउंडेशन अन् बीएसटी आर्मीचा संगमनेरमध्ये स्तुत्य उपक्रम!

30/10/2026

कोर्टाचा दणका! कर्जप्रकरणी वादात शहर पोलीस स्टेशनच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; न्यायालयातून पोलीस निरीक्षकांना थेट नोटीस

30/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी
राजकारण

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

संगमनेरकरांना मोठा दिलासा मिळणार का? दुष्काळामुळे शहरातही कर सवलतीची मागणी, नगरपरिषदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागाप्रमाणेच आता संगमनेर शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी थेट नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्याकडे निवेदन देत शहरातील निवासी मालमत्ताधारकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी केली आहे.
दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण भागापुरत्या मर्यादित नसून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शहरी कुटुंबांच्या अर्थकारणावरही होत असल्याने नगरपरिषदेने या संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.
या निवेदनामध्ये केवळ सवलतीची मागणी करून न थांबता, त्यासाठी नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत तातडीने प्रस्ताव मांडून ठराव मंजूर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याची सूचनाही करण्यात आली आहे. तसेच, नगरपरिषदेच्या अधिकारक्षेत्राबाहेरील बाबींसाठी जिल्हाधिकारी, नगर प्रशासन संचालनालय आणि नगरविकास विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठवून मंजुरी घ्यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
शासनाच्या दुष्काळी निर्णयाच्या अनुषंगाने शहरातील नागरिकांना कोणत्या अन्य शासकीय सवलती लागू होऊ शकतात, याबाबत पालिका प्रशासनाने अधिकृत माहिती व कायदेशीर अभिप्राय सादर करावा, असेही त्यांनी नगराध्यक्षांकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे. दुष्काळी स्थितीमध्ये संगमनेर नगर परिषदेने संगमनेरकर नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. आपण केलेली मागणी ही संगमनेर करांच्या आर्थिक हिताची असल्याने प्रशासनाने यात लक्ष घालावे असे देखील त्यांनी म्हटले आहे.
आता या ज्वलंत मागणीवर पालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि येत्या काही दिवसांत शहरात कोणता राजकीय व प्रशासकीय निर्णय होतो, याकडे संपूर्ण संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 123
घरपट्टी नळपट्टी सवलत माफी दुष्काळ निवेदन मागणी मैथिली तांबे साक्षी सूर्यवंशी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या अधिवेशनातील पाठपुराव्याला यश; राज्यातील १४ हजार ७८७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

30/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर शहरावरही दुष्काळाची छाया! शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी नगराध्यक्षांकडे केली घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये ५० टक्के सवलतीची मागणी

By Annant Ppangarkar30/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण…

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून ३०० आदिवासी चिमुकल्यांना मायेची ऊब; एकविरा फाउंडेशन अन् बीएसटी आर्मीचा संगमनेरमध्ये स्तुत्य उपक्रम!

30/10/2026

कोर्टाचा दणका! कर्जप्रकरणी वादात शहर पोलीस स्टेशनच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; न्यायालयातून पोलीस निरीक्षकांना थेट नोटीस

30/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या अधिवेशनातील पाठपुराव्याला यश; राज्यातील १४ हजार ७८७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा!

30/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.