Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी
राजकारण

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

काही मतदार केवळ दोन ते तीन हजार रुपयांच्या आमिषापोटी धनदांडग्या उमेदवारांना मतदान करून आपले बहुमोल मत विकतात, मात्र भविष्यात त्यांच्यावर एखादा अडचणीचा प्रसंग ओढवल्यास मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2026Updated:28/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील व झाडू विक्रेत्यांसह इतर सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करता यावा, यासाठी १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्त्यालगत योग्य ठिकाणी तात्पुरती दुकाने लावण्यास परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी यांनी केली आहे. यासंदर्भात आज संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
दिवाळी हा सण छोट्या व्यावसायिकांसाठी वर्षातील अत्यंत महत्त्वाचा काळ असून, या दिवसांत मिळणाऱ्या रोजगारावर आणि उत्पन्नावर अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची दिवाळी अवलंबून असते. त्यामुळे या व्यावसायिकांना रोजगाराची आणि व्यवसायाची योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने अत्यंत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शहरात तात्पुरती दुकाने लावण्यास परवानगी देताना वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन नगरपरिषदेने तात्पुरत्या दुकानांसाठी योग्य जागा निश्चित कराव्यात, तसेच छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्यावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख अमर कतारी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना व मतदारांना स्वाभिमान जपण्याचे आवाहन केले. काही मतदार केवळ दोन ते तीन हजार रुपयांच्या आमिषापोटी धनदांडग्या उमेदवारांना मतदान करून आपले बहुमोल मत विकतात, मात्र भविष्यात त्यांच्यावर एखादा अडचणीचा प्रसंग ओढवल्यास मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी दोन-तीन हजार रुपयांसाठी आपला स्वाभिमान विकू नये. मतदान हा लोकशाहीने दिलेला अत्यंत अमूल्य अधिकार असून, तो योग्य आणि पात्र उमेदवाराची निवड करण्यासाठीच वापरावा. पैशांच्या आमिषाला अजिबात बळी न पडता आपल्या हक्कांसाठी आणि शहराच्या विकासासाठी काम करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, असे ठाम प्रतिपादन कतारी यांनी केले.
या निवेदन प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख अमर कतारी, शहरप्रमुख अमित चव्हाण, फैसल सय्यद, उपजिल्हाप्रमुख इम्तियाज शेख, विधानसभा शहरप्रमुख बाळासाहेब घोडके, आसिफ भाई तांबोळी, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय सातपुते यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 215
अमर कतारी अमित चव्हाण छोटे व्यवसाय नगराध्यक्ष मैथिली तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यादी संगमनेर नगरपरिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

माजीमंत्री बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात संगमनेर तालुक्याचा विकासाचा वेग कायम राखणार: आमदार सत्यजित तांबे

26/10/2026

संजय गांधी नगर अन् वडारवस्तीच्या घरांचे उतारे नागरिकांच्या नावावर करण्याची आमदार अमोल खताळ यांची ग्वाही; शिवसेना शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आश्वासन

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

By Annant Ppangarkar28/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील व झाडू विक्रेत्यांसह…

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.