Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/10/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांची कारवाई सुरूच असून, संगमनेर शहरात देखील कारवाई करण्यात आली आहे. कादरीनगर परिसरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तब्बल १० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल व अवैध वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते.
हे पथक सोमवारी (दि. २७) संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, कादरीनगर गल्ली नंबर ०२ मधील मस्जीदे गौसो रजासमोरील मोकळी जागा आणि म्हसोबा मंदिराजवळ काही जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १० गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ३ लाख ४० हजार रुपये किमतीची १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली असून, आदनान असीफ सय्यद (वय २८, रा. देवीगल्ली, मोगलपुरा, संगमनेर) आणि अनस सरवर कुरेशी (वय २४, रा. हावडा ब्रीज, संगमनेर) या दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे कलम ३ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 205
अहिल्यानगर एलसीबी कत्तलखाने कारवाई गोवंश जनावरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026

“सगळे पुढारी पैसे खातात…” संगमनेरात मंदिराच्या बांधकामावरून राडा, चष्मा फोडला अन् शर्ट फाडला! पोलिसांत तक्रार दाखल!

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By Annant Ppangarkar27/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक…

ट्रॅफिक पोलिसांशी झटापट प्रकरण; कारवाईला १४ वर्षानंतर मोठा धक्का! संगमनेरमधील बहुचर्चित प्रकरणात न्यायालयाने दिली क्लिन चिट

27/10/2026

आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकाराने संगमनेरकरांना उपमुख्यमंत्र्यांकडून ‘दिवाळी शिधा’चे मोठे गिफ्ट

27/10/2026

मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या आजचे राशीभविष्य

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.