Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरकरांची दिवाळी समृद्धीची! थोरात कारखान्याकडून २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग; बाजारपेठेत आनंदाचे वातावरण

04/11/2026

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरकरांची दिवाळी समृद्धीची! थोरात कारखान्याकडून २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग; बाजारपेठेत आनंदाचे वातावरण
आर्थिक

संगमनेरकरांची दिवाळी समृद्धीची! थोरात कारखान्याकडून २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग; बाजारपेठेत आनंदाचे वातावरण

दिवाळी सणाच्या काळात अमृत उद्योग समूह, कारखाना व संलग्न विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही रक्कम थेट लोकांच्या हाती आणि खात्यात पोहोचल्याने बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल घडणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/11/2026Updated:04/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
दिवाळीच्या ऐन तोंडावर संगमनेर तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांची दिवाळी अत्यंत गोड आणि आनंददायी ठरणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तब्बल २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग केले आहेत.
या मोठ्या निर्णयामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत प्रचंड उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक व्यापाराला मोठी आर्थिक गती मिळणार आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी ही माहिती दिली.
घुले म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरची सहकार चळवळ आणि कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवले आहे. यंदा दिवाळीनिमित्त कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन २०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले असून कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे.
कारखान्याने केलेल्या या आर्थिक नियोजनानुसार, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे अनुदान, शेअर्स ठेवींवरील व्याज, दिवाळी साखर आणि नियमित पेमेंट या माध्यमातून १२ कोटी ११ लाख रुपये, तर कामगारांच्या बोनसपोटी १० कोटी रुपये, असा एकूण २२ कोटी ११ लाख रुपयांचा निधी बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
दिवाळी सणाच्या काळात अमृत उद्योग समूह, कारखाना व संलग्न विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून ही रक्कम थेट लोकांच्या हाती आणि खात्यात पोहोचल्याने बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल घडणार आहे.
इतर शहरांच्या तुलनेत संगमनेरची ओळख एक अत्यंत विश्वसनीय आणि गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी दिवाळीच्या खरेदीसाठी येथे नागरिकांची मोठी गर्दी असते. अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात आणि तेच पैसे पुन्हा खरेदीच्या माध्यमातून बाजारपेठेत येतात. त्यामुळे व्यापाराचे चक्र गतिमान होऊन आर्थिक समृद्धी निर्माण होते. कारखान्यासोबतच इतर सहकारी संस्थाही कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देणी बँकेत वर्ग करणार असल्याने तालुक्यातील शेतकरी, नागरिक, युवक आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
दिवाळीच्या तोंडावर थेट खात्यात पैसे वर्ग करून मोठा दिलासा दिल्याबद्दल तालुक्यातील शेतकरी, व्यापारी, उत्पादक व कामगारांनी कारखान्याचे मार्गदर्शक लोकनेते बाळासाहेब थोरात, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखाना व अमृत उद्योग समूहाने कायम शेतकरी, सभासद, महिला, युवक आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केले आहे, असे सांगत ही रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे यंदाच्या सणात बाजारपेठेत अभूतपूर्व आर्थिक उलाढाल होईल आणि व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी व्यक्त केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 138
दीपावली बोनस पांडुरंग घुले बँकेत वर्ग बाळासाहेब थोरात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

‘शक्तीस्थळा’वर इंदिरा गांधी अन् सरदार पटेलांना अभिवादन; माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी जागवल्या स्मृती

31/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आर्थिक

संगमनेरकरांची दिवाळी समृद्धीची! थोरात कारखान्याकडून २२ कोटी ११ लाख रुपये बँकेत वर्ग; बाजारपेठेत आनंदाचे वातावरण

By Annant Ppangarkar04/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळीच्या ऐन तोंडावर संगमनेर तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांची दिवाळी…

स्वच्छतेतून समृद्धीकडे संगमनेरची वाटचाल! दिवाळीपूर्वी संगमनेर पॅटर्नची नवी छटा, आज निघणार ‘एक पणती स्वच्छतेची’ भव्य रॅली; यांची राहणार उपस्थिती

04/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.